महापालिकेच्या एनएमसी ई-कनेक्ट नव्या अॅपला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

नाशिक : स्मार्ट नाशिक ऍप्लिकेशनचे नाव बदलून आमुलाग्र बदल करण्यात आलेल्या एनएमसी ई-कनेक्‍ट या पालिकेच्या ऍप्लिकेशनला गेल्या 48 तासात उत्तम प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत सहा हजार 700 ऍप्लिकेशन ऍण्ड्रॉईड मोबाईलवर डाऊनलोड झाले आहेत. तीन दिवसात 175 तक्रारी दाखल झाल्या असून सात दिवसात निराकरण करणे पालिका अधिकाऱ्यांना बंधनकारक राहणार आहे. 

नाशिककरांना गतिमान सेवा देण्याच्या दृष्टीने माजी आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी महापालिकेचे स्मार्ट नाशिक ऍप्लिकेशन विकसित केले होते त्यात विविध प्रकारच्या चाळीस हून अधिक सेवा पुरविल्या. घंटागाडीचे ट्रॅकींगसह नागरिकांना त्यांनी दिलेल्या तक्रारींची व शहरात नगरसेवकांमार्फत सुरु असलेल्या कामाची फोटोसह माहिती हे वैशिष्टे होते. सन 2015 पासून 52 हजार 300 स्मार्ट नाशिकचे ऍप्लिकेशन डाऊलोड करण्यात आले होते. आयुक्त पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट नाशिक ऍप्लिकेशन मध्ये आमुलाग्र बदल करण्याचे धोरण अवलंबिले होते. त्यात चोविस तासात तक्रार न पाहणाऱ्या अधिकायांवर कारवाई पासून ते सात दिवसात तक्रारींचे निराकरण करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. घंटागाडी अलार्म, पेस्ट कन्ट्रोलचे लोकेशन आदी महत्वाच्या बाबींचा त्यात समावेश करण्यात आला आहे. गुरुवार पासून गुगल प्ले स्टोअर वरून एनएमसी ई-कनेक्‍ट ऍप्लिकेशन नागरिकांना डाऊनलोड करता येत आहे. आतापर्यंत नवीन ऍप्लिकेशन सहा हजार 700 नागरिकांनी डाऊनलोड केले आहे. पुर्वीचे ऍप्लिकेशन अपडेट केल्यानंतर नवीन ऍप्लिकेशनच्या सुविधा नागरिकांना मिळणार आहे. त्यानुसार पुर्वीचे ऍप्लिकेशन व नवीन ऍप्लिकेशन डाऊनलोडधारकांची संख्या तब्बल 59 हजारांच्या वर पोहोचली आहे. 
--------- 

Web Title: marathi news nmc E-connect