दिव्यांगांना महापालिकेकडून दोन हजार पेन्शन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

दिव्यांगांना महापालिकेकडून दोन हजार पेन्शन 

नाशिक ः महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींसाठी महापालिकेने विविध योजना आखल्या आहेत. महासभेची मंजुरी मिळालेल्या या प्रस्तावामध्ये तीन टक्के राखीव निधीतून प्रौढ बेरोजगार दिव्यांगांना दरमहा दोन हजार रुपये निवृत्तिवेतन दिले जाणार आहे. प्रशिक्षण व व्यवसायासाठी एक लाखापर्यंतचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

महापालिकेच्या एकूण अंदाजपत्रकापैकी तीन टक्के राखीव निधी अपंगांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. गेल्या वर्षापर्यंत अंधांसाठी राखीव असलेला निधी इतरत्र वर्ग केला जात होता. गेल्या वर्षी जुलैमध्ये प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू व तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यात वाद होऊन प्रकरण हात उगारण्यापर्यंत पोचले होते. त्यानंतर महापालिकेने तीन टक्के निधी अपंगांच्या योजनांवर खर्च करण्यासाठी पावले उचलली. त्यानुसार महासभेवर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली.

बांधकामविषयक कामांवर निधी खर्च न करता प्रत्यक्ष लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कर्णबधिरांना सर्जरीसाठी तीन लाख रुपये अनुदान, स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य योजनेंतर्गत एक लाखापर्यंतचे अनुदान, प्रौढ बेरोजगार दिव्यांगांसाठी प्रतिमाह दोन हजार रुपये निवृत्तिवेतन, दिव्यांगांच्या पालकांकरिता शिक्षण-प्रशिक्षण अर्थसहाय्य योजनेंतर्गत पाच ते 50 हजारांपर्यंत अनुदान, शिष्यवृत्ती व व्यवसाय प्रशिक्षणासाठी 20 ते 50 हजार रुपये अर्थसहाय्य, दिव्यांगांना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान याकरिता 40 हजारांपर्यंत अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला

. विशिष्ट गरजा असलेल्या दिव्यांगांना एक लाखापर्यंत अनुदान दिले जाणार आहे. महापालिका हद्दीतील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था, संघटनांचे सक्षमीकरण करण्यासाठी शिक्षण व प्रशिक्षणासाठी तीन लाखांपर्यंत, तर दिव्यांग संघटनांसाठी एक लाखापर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. 

Web Title: marathi news nmc pension amount