केन्सिंग्टनविरोधात मनपाची न्यायालयात तक्रार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

नाशिक : महापालिकेने केन्सिंग्टन क्‍लब विरोधात कारवाई केल्यानंतर त्याविरोधात मालक प्रकाश मते यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले असतानाचं पालिकेने आता आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती केली आहे. 

पुररेषेतील ग्रीन फिल्ड लॉन्सची संरक्षक भिंत पाडल्यानंतर त्याविरोधात मालक मते यांनी न्यायालयात तक्रार दिली होती त्यानुसार आयुक्त तुकाराम मुंढे यांना न्यायालयाची माफी मागावी लागली होती. त्यानंतर न्यायालयाने लॉन्सची संरक्षक भिंत बांधून देण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेने संरक्षक भिंत बांधण्याचे काम सध्या सुरु केले आहे. न्यायालयात पालिकेची मानहानी झाल्यानंतर चांदशी शिवारातील मते यांच्या मालकीच्या केन्सिंग्टन क्‍लब ला लक्ष करतं पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नोटीस पाठविली.

दोन वर्षांपुर्वी गोदावरीला आलेल्या पुरात केन्सिंग्टन क्‍लबच्या संरक्षक भिंतीमुळे महापालिकेने बांधलेली भिंत पडल्याचा दावा करताना 48 तासात 1.40 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. परंतू पालिकेची नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा करतं मते यांनी पुन्हा उच्च न्यायालयात दावा दाखल केला. सदर याचिकेवर 19 जानेवारी 2019 सुनावणी होणार आहे. या दरम्यान कायद्यातील तरतुदी नुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने महापालिकेकडे वर्ग केलल्या अधिकारानुसार जिल्हा सत्र न्यायालयात तक्रार दाखल करण्याच्या सुचना आयुक्त मुंढे यांनी दिल्या आहेत. 
 
Web Title: marathi news nmc procedings

टॅग्स