पुढील आठवड्यात प्रभाग समिती सभापती पदाचा बार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

नाशिक- सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक दहा "ड' मधील पोटनिवडणुक बिनविरोध झाली असली तरी अद्यापही आचारसंहिता लागु असल्याने त्याचा परिणाम प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीवर होणार आहे. पालिकेच्या नगरसचिव विभागाने विभागिय आयुक्तांकडे सभापती पदाच्या निवडणुकीसाठी परवानगी मागितली आहे. आचारसंहिता संपुष्टात येताच पुढील आठवड्यात सभापती पदाच्या नियुक्तीचा बार उडणार आहे. 

प्रभाग दहा ड मध्ये पोटनिवडणुकीमुळे आचारसंहिता लागु झाली आहे. त्यामुळे सहा प्रभाग समित्यांच्या सभापती पदाची निवडणुक आचारसंहितेच्या चौकटीत अडकली आहे. मार्च महिन्यात सभापतींची मुदत संपुष्टात आली. पण त्यावेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु असल्याने नगरसचिव विभागाचा प्रस्तावावर विभागिय आयुक्तांकडून कुठलाचं निर्णय देण्यात आला नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nmc sabhpati selection process