सातव्या वेतन आयोगासाठी महापालिका कर्मचारी आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

नाशिक- महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु करावा या प्रमुख मागणीसाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने प्रशासनाला संपाचा इशारा दिला आहे. प्रलंबित मागण्या पुर्ण न झाल्यास 10 जुलैपासून संप पुकाण्याचा ईशारा महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. 

महापालिकेच्या कायम स्वरुपी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, शंभर टक्के पदोन्नती द्यावी, वैद्यकीय विमा योजना पुन्हा सुरु करावी, कामगार कल्याण निधीतून विम्याची रक्कम अदा करावी, रिक्त पदे त्वरीत भरावी, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपातत्वावर महापालिकेच्या सेवेत समावून घ्यावे, वैद्यकीय भत्यातील वाढ अमलात आणावी, सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने घरे कायमस्वरूपी नावावर करावी, लाड, पागे, बर्वे, मकवाना समिती व सफाई कर्मचारी आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, बंद अंगणवाड्या पून्हा सुरु कराव्या, बायोमेट्रीक हजेरीची सक्ती रद्द करावी आदी मागण्या संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक प्रविण तिदमे, सरचिटणीस राजेंद्र मोरे यांनी केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nmc worker meet