साडेतीनशे किलो प्लॅस्टीक जप्त,साडेतीन लाखांच्या दंडाची वसुली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

नाशिकः एरव्ही सहजपणे हाताळता येणारी प्लॅस्टीक कॅरीबॅग आता वापरता येणार नसल्याची जाणीव व्यावसायिकांसह सर्वसामान्यांना झाल्याने त्याचा परिणाम नागरिकांसह व्यावसायिकांची तारांबळ उडाली. किराणा माल, भाजीपाला एवढेचं नव्हे तर कपडे सुध्दा कागदांमध्ये गुंडाळून द्यावे लागले. दुध, तेल, ताकासाठी नागरिकांना ठेवणीतले भांडे बाहेर काढावे लागले.

नाशिकः एरव्ही सहजपणे हाताळता येणारी प्लॅस्टीक कॅरीबॅग आता वापरता येणार नसल्याची जाणीव व्यावसायिकांसह सर्वसामान्यांना झाल्याने त्याचा परिणाम नागरिकांसह व्यावसायिकांची तारांबळ उडाली. किराणा माल, भाजीपाला एवढेचं नव्हे तर कपडे सुध्दा कागदांमध्ये गुंडाळून द्यावे लागले. दुध, तेल, ताकासाठी नागरिकांना ठेवणीतले भांडे बाहेर काढावे लागले.

  ग्रामिण भागातून शहरात कामानिमित्त आलेल्या नागरिकांना प्लॅस्टीक बंदीची माहिती नसल्याने अनेकांना यासाठी देखील दंड द्यायचा काय अशी हाताश प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. 
राज्य शासनाने मार्च महिन्यात केलेल्या प्लॅस्टीक व थर्माकॉल बंदीची घोषणा केली होती त्यानंतर विल्हेवाट लावण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली.

शनिवार पासून कारवाईला सुरुवात झाली. महापालिकेने सहा विभागात प्रत्येकी आठ जणांचे पथक तैनात केले. अनेक भागामध्ये नागरिकांनी महापालिकेकडे प्लॅस्टीक स्वताहून जमा केले. भद्रकाली, मेनरोड, रविवार कारंजा, शिवाजी रोड या भागामध्ये दुकानदारांनी प्लॅस्टीक पिशव्या बंदचे बोर्ड लावले. 
 

350 किलो प्लॅस्टीक जप्त 
दिवसभरात साडे तीनशे किलो प्लॅस्टीक जप्त करण्यात आले. एकुण 72 जणांवरील कारवाईतून 3 लाख 60 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. पालिकेच्या खतप्रकल्पावर जमा झालेल्या प्लॅस्टीकची विल्हेवाट लावली जाणार आहे. घरातील प्लॅस्टीकची विल्हेवाट लावण्यासाठी विभागिय कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. 

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 
- घंटागाड्यांमध्ये प्लॅस्टीक कचऱ्याचे प्रमाण वाढले. 
- प्लॅस्टीकचे वेस्टन असलेला माल विक्रीला नकार. 
- थर्माकॉल बंदीमुळे टिव्ही, फ्रीज आदी इलेक्‍ट्रॉनिक वस्तुं विक्रीवर परिणाम 
- कागदी पिशव्यांचा दर 40 ते 45 रुपये प्रतिकिलो. 
- कागदी, कापडी पिशव्या तयार करण्याचा व्यवसाय तेजीत. 
- कागदी रद्दीच्या दरात वाढ. 
- प्लॅस्टीक बॉटलची विक्री सुरुचं. 

विभागनिहाय प्लॅस्टीक जप्तीची कारवाई 
विभाग कारवाई दंड वसुली 

पुर्व 14 70, 000 
पश्‍चिम 15 75, 000 
नाशिकरोड 12 60,000 
पंचवटी 16 80,000 
सातपूर 05 25,000 
सिडको 10 50,000 
एकुण 72 3,60,000 
 

Web Title: marathi news no plastic

टॅग्स