उत्तर भारतीय नेत्यांची नाशिकमध्ये संपर्क मोहीम 

residentional photo
residentional photo

सातपूर ः लोकसभेच्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या टप्प्यांत उत्तर भारतात होणाऱ्या मतदानात आपल्या पक्षासाठी जास्तीत जास्त मते मिळण्यासाठी या राज्यातील कॉंग्रेस, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष तसेच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी नाशिकसह इतर जिल्ह्यातील हिंदी भाषिक मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नाशिकमधील सातपूर, अंबडमध्ये राहणाऱ्या हिंदी भाषिक मतदारांवर डोळा ठेवून विशेष संपर्क मोहीम राबवली जात आहे. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच नाशिकमधील उत्तर भारतीय मतदारांकडे लक्ष वेधून विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले होते. या वेळी या नागरिकांचे मतदान आपल्याकडे वळविण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बसप, सप तसेच लालूप्रसाद यांच्या पक्षासह उत्तर भारतातील प्रमुख राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते नाशिकमधील स्थानिक नेत्यांना हाताशी धरून प्रचार करताना पाहायला मिळाले. लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम सात टप्प्यांत जाहीर झाल्याने या संधीचा फायदा घेण्यासाठी परप्रांतीय मतदारांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवली जात आहेत. त्याचप्रमाणे लोकसभा व विधानसभेसाठी स्थानिक इच्छुक उमेदवारांना मदत करण्याचा दावा केला जात आहे. उत्तर भारतातील विविध राज्यांत बहुतांश पहिल्या ते तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे, तर महाराष्ट्रात नाशिक, ठाणे, मुंबई या मतदारसंघांत चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे, तोपर्यंत हे मतदार नाशिकमध्ये कसे दाखल करायचे, याचाही आरखडा तयार करण्यात येत आहे. सातपूर, अंबड, श्रमिकनगर, दत्तनगर, म्हाडा कॉलनी, भंगार मार्केट आदी भागांत हिंदी भाषिक व परप्रांतीय मतदारांची संख्या जास्त आहे. 

यूपीचे नेते डेरेदाखल 

नाशिकमध्ये दोन महिन्यांपूर्वी विधानसभेला इच्छुक असलेल्या एका उमेदवाराने उत्तर भारतीय मतदारांवर डोळा ठेवून भव्य पार्टीचे आयोजन केले होते. याच पार्टीत मतदारांना उत्तर भारतात नेण्याची योजना तयार केली. या पार्टीत उत्तर भारतातील सिद्धार्थनगर, आजमगड, लखनौ, सहानपूर, मुझफ्फरनगर, धनबाद, रांची, गोरखपूर आदी भागांतील राजकीय पक्षाचे नेतेही उपस्थित होते. 

सातपूर-अंबड लिंक रोडवरील अनधिकृत भंगार बाजार सत्ताधारी भाजपच्याच सत्ताकाळात हाटविण्यात आल्याने हा मतदार मोठ्या प्रमाणावर नाराज आहे. त्यात बहुतांश मतदार मुस्लिम असल्याने सप, बसप तसेच कॉंग्रेसकडूनही या मतदारांना घेऊन जाण्यासाठी विशेष यंत्रणा राबवली जात आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com