वरखेडे येथील जिल्हा बँक सुरु करण्याची मागणी 

दीपक कच्छवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

जिल्हा बँकेने येथील बंद केलेल्या शाखेचे सर्व दप्तर व खातेदाराची माहिती लोंढे जिल्हा बँकेच्या शाखेला जोडली आहे. बंद झालेली वरखेडे शाखा ही सहकार महर्षी उदेसिंग पवार यांनी 1984 मध्ये सुरु केली होती. मात्र या शाखेत व्यवहार अत्यंत कमी होत होते. त्यामुळे ही शाखा बंद करण्यात आली.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील शाखा बंद केली आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ व वयोवृद्धांचे हाल होत आहेत. बंद झालेली जिल्हा बँकेची शाखा पुन्हा काऊंटर स्वरुपात सुरु करावी, अशी मागणी होत आहे. वरखेडे येथील शेतकरी व ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा बँकेने येथील बंद केलेल्या शाखेचे सर्व दप्तर व खातेदाराची माहिती लोंढे जिल्हा बँकेच्या शाखेला जोडली आहे. बंद झालेली वरखेडे शाखा ही सहकार महर्षी उदेसिंग पवार यांनी 1984 मध्ये सुरु केली होती. मात्र या शाखेत व्यवहार अत्यंत कमी होत होते. त्यामुळे ही शाखा बंद करण्यात आली. 

सध्या या बँकेत चार कोटी रुपयांची ठेव असणे आवश्यक होते. मात्र ठेवीचे उद्दिष्टे पुर्ण होत नसल्याने शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या या बँकेची 1 कोटी 20 लाख रूपये ठेव आहे. काऊंटर सुरु करावे वरखेडे ते लोंढे चार किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे वरखेडेतील ग्रामस्थांना लोंढे जाणे खुप अवघड होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता जिल्हा बँकेने वरखेडे येथे पुन्हा काऊंटर सुरु करावे. जेणेकरून शेतकरी व ठेवीदारांची गैरसोय होणार नाही. यासाठी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहीणी खडसे यांनी दखल घेऊन येथे पुन्हा बँक काऊंटर सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. दुसरीकडे वयोवृध्दांना आपले निवृत्तीवेतन घेण्यासाठी अक्षरश: गावातील दुचाकी वाहन असलेल्या तरूणांच्या विनवण्या करून त्याच्या वाहनात अर्धा लिटर पेट्रोल टाकुन घेऊन जावे लागते. वरखेडेच्या बँक शाखेत डिपॉझिट कमी होते. शिवाय या शाखेत दिवसभरात दोन ते तीन खातेदारांचेच व्यवहार होत होते. दोन कर्मचारी नियुक्त असल्याने त्यांचा पगार विजबील आदी खर्च लक्षात घेता ही शाखा जिल्हा बँकेला परवडणारी नव्हती. त्यामुळेच ती बंद करण्यात आली आहे, असे चाळीसगाव येथील जिल्हा बँकेचे विभागीय व्यवस्थापक दिलीप पवार यांनी सांगितले. 
लोंढे शाखेत गेल्यानंतर निवृत्ती वेतनाचे किंवा इतर शासकीय योजनांचे पैसे खात्यावर जमा झालेले नसल्यामुळे त्यांना खाली हात परतावे लागते. त्यामुळे सहाशे रूपये पगारासाठी पन्नास रुपये खर्च करावा लागत आहेत. यथील ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेता येथे पुन्हा बँक सुरु करावी अशी मागणी होत आहे.

 

Web Title: marathi news north maharashtra district cooperative bank