छगन भुजबळांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवा : आ. दीपिका चव्हाण 

रोशन खैरनार
गुरुवार, 1 मार्च 2018

सटाणा : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आमदार छगन भुजबळ यांच्या ज्येष्ठत्वाचा विचार करून त्यांना उपचारांसाठी तात्काळ ब्रीच कॅण्डी, हिंदुजा किंवा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात यावे. त्यासाठी आर्थर रोड तुरुंग प्रशासनास योग्य ते आदेश करावेत, अशी मागणी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी बुधवारी (ता.२८) रोजी मुंबई येथे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

याबाबत आमदार चव्हाण यांनी आज बागडे यांची विधानभवनात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी दिलेल्या निवेदनात, गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार छगन भुजबळ यांना चौकशीसाठी तुरुंगात डांबून ठेवण्यात आले आहे. आजपर्यंत त्यांच्यावरील आरोपांची चौकशी होऊ शकलेली नाही. हे प्रशासनाचे अपयश आहे. न्यायालयात जामिनीसाठी वारंवार अर्ज करूनही सरकारी वकील न्यायालयात गैरहजर असल्याचे कारण देत जामीन अर्जावरील सुनावणी हेतूपुरस्सर लांबविली जात आहे. केवळ राजकीय आकसापोटी त्यांना जामीन मिळू दिला जात नाही. त्यामुळे राज्यभर सामान्य जनतेमध्ये असंतोष पसरला आहे.

आमदार भुजबळ यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून गेल्या दहा - पंधरा दिवसात त्यांचे वजन दहा किलोने घटले आहे. त्यांच्यावर आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून आरोग्याची कोणतीही काळजी घेतली जात नाही. अध्यक्षमहोदय या नात्याने आपण याप्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन आमदार भुजबळ यांना चांगले उपचार मिळावेत म्हणून आर्थर रोड तुरुंग प्रशासनास आदेश करावेत असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

Web Title: Marathi news north maharashtra news chhagan bhujbal hospital demand