शिक्षण हेच खरे समाज आणि स्वतःच्या उन्नतीचे साधन-एम आर सुंदरेश्वरन 

Igatpuri
Igatpuri

इगतपुरी (नाशिक) : शिक्षण हेच खरे समाज आणि स्वतःच्या उन्नतीचे साधन असून वंचितांसाठी चांगल्या शिक्षणासाठी सुविधा साधून एम्पथी फाउंडेशनने जो वसा घेतला आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आमचा सतत प्रयत्न राहील ,असे प्रतिपादन एम्पथी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम आर सुंदरेश्वरन यांनी केले.

बोरटेंभे ता इगतपुरी येथे  लोकसहभागातून तब्बल एक कोटीच्या दहा वर्गखोल्यांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एम्पथी फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक राजेन छेड्डा, किन्नरी छेड्डा, इशिता छेड्डा, त्र्यंबक नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार, उपसभापती भगवान आडोळे, विठ्ठल लंगडे, महेश शिरोळे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, गटशिक्षणाधिकारी पाडुंरंग वमने, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक मुंढे, शिवाजी आहिरे, राजेश तायडे, विजय पगार, कैलास सांगळे, हिराबाई खतेले, श्रीराम आहेर व आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी सांगितले की, शालेय रंगरंगोटीपासून ई-लर्निंग साहित्य, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वतंत्र संगणक कक्ष, स्वतंत्र वाचनालय अन् मुख्याध्यापक खोली व कलादालन अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उभ्या राहील्या आहेत ही नक्कीच गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या प्रसंगी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी मनोगतात सांगितले की, गावाने व शिक्षकांनी साकारलेली इमारत ही स्मार्ट डिजीटल शाळेसारखी झाली असून, लोक सहभागातून शाळांचे चित्र कसे बदलु शकते याचा प्रत्यय बोरटेंभेची शाळा बघितल्यावर येत असल्याचे मत व्यक्त केले.

उपसभापती भगवान आडोळे यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. लोकसहभागातून साकारण्यात आलेल्या या शाळेत संगणक कक्ष सरंक्षण भिंत, रंगरंगोटी एल ई डी टीव्ही संच टॅबलेटसह, शाळेभोवती उद्यान, ई-लर्निंगसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा, डिजिटल शाळा व गावकऱ्यांनी स्वतः बांधून घेतलेल्या विविध बाबींचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी शाळा व्यवस्थान समिती अध्यक्षा संगीता आडोळे, उपाध्यक्ष देवीदास आडोळे, सदस्य रविंद्र आडोळे, संतोष आडोळे, सोमनाथ नवले, छाया आडोळे, पुष्पा आरशेंडे, सविता आडोळे, रामचंद्र आडोळे, मुक्ता दुभाषे, हरिदास गवळी, सोमनाथ आडोळे, लक्ष्मीकांत आडोळे, मुकुंदा आडोळे, मिनिनाथ आरशेंडे उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय पगारे व अतूल आहीरे यांनी केले. माणिक भालेराव यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका रंजना अहीरे, गोपाळ मैंद, ज्ञानेश्वर भोईर, विजय पगारे, अतूल आहिरे, माणिक भालेराव, ज्वाला भोसले प्राजक्ता महाजन आदी उपस्थित होते. ज्ञानेश्वर भोईर यांनी आभार व्यक्त केले.

शाळेला बारा संगणकांची भेट
उद्घाटनाप्रसंगी मनोगतात ग्रामस्थांचे व शिक्षकांचे कौतूक करीत सर्वात सुंदर इमारत आज आम्ही तुम्हाला दिली आहे. इथल्या मुलांची चांगली प्रगती करण्याचे आवाहन करुन माझ्याकडुन शाळेला बारा संगणक, इंटरनेट कनेक्शन व एक इ लर्निंगचे किट भेट म्हणुन देत असल्याचे एम्पथी फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक राजेन छेड्डा यांनी घोषित केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com