शाळेस संरक्षक जाळी बसवून शिवराजे फ्रेंड्स सर्कलचा प्रेरणादायी उपक्रम

Shivraje-circle
Shivraje-circle

खामखेडा (नाशिक) : देवळा-नाशिक रस्त्यालगत देवळा शहरापासून सात किमीच्या अंतरावर जिल्हा परिषदेची भावडे ही शाळा अगदी रस्त्याला लागून आहे. शाळेला संरक्षक भिंत अथवा कुंपण नसल्याने रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या उतारू अथवा वाटसरूंचा नेहमीच उपद्रव असे. परिणामतः शाळेची सुरक्षा व स्वच्छता या दोन्ही बाबींचा प्रश्न तयार झाला होता. येथील उपक्रमशील शिक्षक अनिल सावंत यांनी ही बाब पालकांना पटवून दिली. शिवजयंतीच्या निमित्ताने शिवराजे फ्रेंड्स सर्कलचे युवक शाळेत आले त्यांनाही याविषयी साकडे घालण्यात आले.

शाळेची प्रगती व उपक्रम पाहून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेचच कामाला सुरुवात केली. मंडळाचे अध्यक्ष राकेश गुंजाळ व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब भदाणे यांच्या नेतृत्वाखाली युवक एकत्र आले. स्वतः हातात टिकाव, फावडे, कुऱ्हाड घेऊन शिवजयंतीच्या दिवशीच शाळेभोवतालचा परिसर स्वच्छ केला. कुंपणासाठी खड्डे खोदणे, खांब उभे करणे, त्यांना रंग देणे, जाळी आणणे, ओढणे ही कामे  स्वतःच करून या युवकांनी समाजासमोर एक चांगला आदर्श घालून दिला. अवघ्या सात दिवसात शाळेला दोनशे फूट संरक्षक जाळी बसवून समाजपयोगी कार्य केल्याचे समाधान मिळवले.

याकामी  भाऊसाहेब भदाणे, राकेश गुंजाळ, सागर मोरे, रवींद्र भदाणे, दत्तात्रय वाघ, कैलास आहेर, समाधान माळी,पंकज भदाणे, निवृत्ती वाघ आदींनी परिश्रम घेतले.
मुख्याध्यपिका कल्पना सोनवणे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

 "गेल्या दोन तीन वर्षांच्या कालावधीत शाळेने विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे.विशेषतः या शाळेचे उपक्रमशील शिक्षक अनिल सावंत व मुख्याध्यपिका कल्पना सोनवणे यांनी शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी चांगले प्रयत्न केले आहेत.शिवजयंतीचे औचित्य साधून शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आमच्या सर्व मित्रांनी सावंत सरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शाळेला संरक्षक जाळी बसवून दिली याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. यापुढेही शाळेला पूर्ण सहकार्य राहील" राकेश गुंजाळ यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com