दिवेकरांनी घेतला जळगाव जिल्हा परिषदेचा पदभार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

जळगाव : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची पुणे महापालिकेच्या अप्पर आयुक्तपदी बदली झाली. त्यांच्या रिक्त पदावर नियुक्‍त झालेले एस. के. दिवेकर यांनी आज दुपारी बाराला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाचा पदभार स्विकारला. 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कौस्तुभ दिवेगावकर यांची दहा महिन्यांपुर्वी म्हणजे 24 एप्रिल 2017 नियुक्‍ती झाली होती. यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचा कारभार समजून घेत ग्रामविकासाच्या दृष्टीने फिल्डवर जाण्यास सुरवात केली होती. याच दरम्यान त्यांची बुधवारी (ता.28) पुणे महापालिकेच्या अप्पर आयुक्‍तपदी बदली झाली असून, त्यांनी आज सकाळी पदभार सोडला होता. त्यांच्या रिक्‍त पदावर मुंबई एमआयडीसीचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी एस. के. दिवेकर यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे. दिवेकर यांनी आज दुपारी बाराला जिल्हा परिषदेत येवून अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांच्याकडून सीईओंचा पदभार स्विकारला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे उपस्थित होते. पदभार घेतल्यानंतर दिवेकर यांनी सर्व विभाग प्रमुखांना बोलून बैठक घेतली. 

Web Title: Marathi news north maharashtra news jalgao jilha parishad