ओखी वादळग्रस्त द्राक्ष उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी - आ. दीपिका चव्हाण

रोशन खैरनार
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

सटाणा : बागलाण तालुक्यात गेल्या डिसेंबर महिन्यात ओखी वादळामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असताना शासनाकडून आजपर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

शासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देऊन त्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज सोमवारी (ता.२६) पहिल्याच दिवशी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले.

मुंबई येथे विधानभवनात आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडवणीस यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात, ओखी वादळामुळे बागलाण तालुक्यातील ९५६ शेतकऱ्यांच्या तयार असलेल्या व निर्यातक्षम द्राक्षबागांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते. तालुक्यातील जवळपास ९०० हेक्टर क्षेत्र ओखी वादळामुळे बाधित झाले होते. पिंगळवाडे, चौगाव, मुंगसे, करंजाड, वीरगाव, वनोली, कर्हे, रातीर, रामतीर, वायगाव, सुराणे, सारदे, नळकेस, पिंपळकोठे, ब्राह्मणगाव, पारनेर, निताणे, भूयाणे, दसाणे, केरसाने, किकवारी, जोरण, जाखोड या गावांसह एकूण ७९ गावातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या तयार झालेल्या द्राक्ष बागा उध्वस्त झाल्या. या वादळात द्राक्ष बागांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होऊन होत्याचे नव्हते झाले आहे. उत्पादनावर झालेला खर्च, खाते, आंतरमशागत, औषधे, मजुरी यावरच लाखो रुपये खर्च करून निर्यातक्षम द्राक्षांची निर्मिती करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या पाच वर्षांपासून बेमोसमी पाऊस, गारपीट, वादळी वारे व गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या ओखी वादळाच्या तडाख्याने द्राक्ष बागा उध्वस्त झाल्याने आता पुढील हंगामात द्राक्ष पिक घ्यावे की संपूर्ण बागा उपटून टाकाव्यात या द्विधा मनस्थितीत द्राक्ष उत्पादक शेतकरी सापडला आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून ओखीग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही यावेळी सौ.चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री फडवणीस यांनी दिल्याचेही आमदार सौ.चव्हाण यांनी स्पष्ट केले. 
 
Web Title: Marathi news north maharashtra news okhi grapes loss farmers