17 वर्षांनी 'तो' बोलला आई आणि भावाशी

दिगंबर पाटोळे
सोमवार, 12 मार्च 2018

वणी(नाशिक) - आध्यात्माच्या आवडीमुळे घरदार सोडून वणीमध्ये आलेल्या 40 वर्षीय तरुणाचा तब्बल 17 वर्षांनी आई व भावाची सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्क झाला. उमेश रामप्रकाश महतो असे या तरुणाचे नाव आहे. गडावरील मनसेचे पदाधिकारी ईश्वर कदम, माजी उपसरपंच संदीप बेनके यांच्या पुढाकाराने हे शक्य झाले. एवढ्या वर्षानंतर भावाशी फोनवर बोलताना उमेशला आनंदाश्रु अनावर झाले.

वणी(नाशिक) - आध्यात्माच्या आवडीमुळे घरदार सोडून वणीमध्ये आलेल्या 40 वर्षीय तरुणाचा तब्बल 17 वर्षांनी आई व भावाची सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्क झाला. उमेश रामप्रकाश महतो असे या तरुणाचे नाव आहे. गडावरील मनसेचे पदाधिकारी ईश्वर कदम, माजी उपसरपंच संदीप बेनके यांच्या पुढाकाराने हे शक्य झाले. एवढ्या वर्षानंतर भावाशी फोनवर बोलताना उमेशला आनंदाश्रु अनावर झाले.

उमेश हा मुळचा भारत - नेपाळच्या सीमेरेषे लगत सितामढी(बिहार) जिल्ह्यातील सोनवर्षा गावातील रहिवासी आहे. त्याचे वडील श्रीराम मंदीरात पूजारी होते तसेच ते परिसरातील प्रसिद्ध किर्नतकारही होते. त्यामुळे धार्मिक वातावरणाचा त्याच्यावर पगडा होता. अध्यात्माच्या याच आवडीसाठी त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याला भारत भ्रमण कराण्याची देखील इच्छा होती. ''माझे मन या गावात रमत नाही. मला त्यागी वृत्ती जोपासायची आहे. संसाराचा त्याग करायचा आहे'' असे उमेश नेहमी सांगत असे. परंतु, त्याच्या आईचा या गोष्टीला विरोध असल्याने रागाच्या भरात आईने उमेशला, ''घर सोडून गेलास तर आमच्यासाठी मेला असे आम्ही समजू'', असे सांगितले होते. त्यामुळे घर सोडल्यावर उमेशने घरच्यांशी कोणताही संपर्क केला नाही. 

गडावरील मनसेचे पदाधिकारी ईश्वर कदम हे उमेश महतो याच्याशी गप्पा मारत असतांना त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा विषय निघाला. घरातील भावडांची विचारपुस करतांना नाव विचारले असता, त्याचा मोठा भाऊ अमरनाथ महतो यांचे नाव फेसबुकवर सर्च केले. अमरनाथचे नाव, फोटो, गावाची माहिती फेसबुकवर मिळाली. त्याचा फोटो उमेलशला दाखवताच त्याने भावाला ओळखले. कदम यांनी लागलीच अमरनाथचा संपर्कक्रमांक मिळवून उमेश आणि अमरनाथचे बोलणे करून दिले. उमेशने या निमित्ताने आपल्या 80 वर्षीय वयोवृद्ध आईशीही संवाद साधला. आपले वडील आठ वर्षापूर्वी तर सर्वात मोठ्या भावाचे दहा वर्षांपूर्वी निधन झाल्याचे कळाल्याने एका डोळ्यात आनंदाश्रु तर एका डोळ्यात दु:खाश्रूंना उमेशने मनमोकळी वाट करुन दिली. यावेळी माजी उपसरपंच संदीप बेनके, ईश्वर कदम यांनी उमेशला धीर देत कुटुंबीयांशी लवकरच भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

2001मध्ये गाव सोडलेल्या उमेशने थेट मुंबई गाठली. मुंबईतील जोगेश्वरी माता मंदिरात तो सेवा करु लागला. तसेच त्याने या काळात भारतातील विविध धार्मिक तीर्थक्षेत्रांनाही भेटी दिल्या. 5 वर्षांपूर्वी त्याने मुंबई सोडून सप्तश्रृंग गड गाठला. स्पप्तश्रृंगी गडावर आल्यानंतर गडावर मिळेल ते काम करु लागला. कामातील प्रामाणिकपणामुळे गडावरील व्यवसायीक तरुणांशी त्याची ओळख झाली. संगळ्यांशी असलेल्या सलोख्यामुळे उमेशला ईश्वर कदम, योगेश कदम, संदीप बेनके, मयूर जोशी, नीलेश कदम, रवी कदम आदींनी व्यवसायासाठी आर्थिक मदतही केली. त्या मदतीतून त्याने गडावर धागा विक्रीचे काम सुरू केले. त्यातून हळूहळू त्याने चांगली प्रगतीही केली. व्यवसाय करता करता गडावरील स्वामी जनार्दन महाराजांच्या मठात नियमित पूजापाठ करुन तिथेच वास्तव्य करुन सेवा देखील तो करु लागला. महिन्यातून एक ते दोन वेळा भाविकांना पनीर व प्रसादाचे वाटप करण्याचेही तो काम करतो.
 

Web Title: marathi news north maharashtra social media umesh mohto