बोगस आयपीएस अधिकाऱ्याने घातला ओलासह हॉटेल्सला गंडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

नाशिक : आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून मुंबईतून ओला टॅक्‍सी भाड्याने करीत नाशिक-शिर्डी फिरून झाल्यानंतही चालकाला भूलथापा देत गंडा घातला. हॉटेल्स बुक केल्यानंतर चेकआऊट न करता चावीसह निघून जाण्याने चालकाला संशय आला आणि बोगस आयपीएस अधिकाऱ्यांचा भांडाफोड झाले.     

याप्रकरणी सरकारवाडा व मुंबई नाका पोलिसात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. अमित अंबिका सिंग (25, रा. ए405, बिनाकुमारी सोसायटी, महात्मा फुले रोड, मुलूंड इस्ट, मुंबई) असे बोगस आयपीएस संशयिताचे नाव आहे. 

नाशिक : आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून मुंबईतून ओला टॅक्‍सी भाड्याने करीत नाशिक-शिर्डी फिरून झाल्यानंतही चालकाला भूलथापा देत गंडा घातला. हॉटेल्स बुक केल्यानंतर चेकआऊट न करता चावीसह निघून जाण्याने चालकाला संशय आला आणि बोगस आयपीएस अधिकाऱ्यांचा भांडाफोड झाले.     

याप्रकरणी सरकारवाडा व मुंबई नाका पोलिसात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. अमित अंबिका सिंग (25, रा. ए405, बिनाकुमारी सोसायटी, महात्मा फुले रोड, मुलूंड इस्ट, मुंबई) असे बोगस आयपीएस संशयिताचे नाव आहे. 

    जगप्रसाद रामदिन मोर्या (रा. फातिमा निवास बिल्डिंग, खेतवाडी, ग्रॅन्ट रोड, मुंबई) या ओला कंपनी चालकाने सरकारवाडा पोलिसात फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगप्रसाद मोर्या ओलाच्या होंडा आयकॉर्न कारवर (एमएच 01 सीजे 4744) चालक असून गेल्या 16 मार्च रोजी दुपारी दीड वाजता मुलूंडमधील महाकालीनगर येथील ग्राहकाची बुकिंग आली. त्याठिकाणी संशयित अमित सिंग याने स्वत:ची ओळख आरपीएस अधिकारी असल्याची सांगून आणखी एकाला सोबत घेत ते नाशिकला आले.

संशयित सिंग याच्या कमरेला पिस्तुल असल्याने चालकाला विश्‍वास पटला. नाशिकच्या सिडकोतील एक्‍सीलेन्सी इन या हॉटेलमध्ये तीन दिवस थांबले. 18 मार्चला हॉटेल सोडले आणि मुंबईला न जाता शिर्डी येथे एक कोटी रुपये घ्यायचे असल्याचे सांगत ते पैसे मिळाल्यानंतर गाडीचे भाडे देतो असे सांगितले. मात्र शिर्डी न जाता तिडके कॉलनीतील एसएसके हॉटेलमध्ये 18 ते 21 मार्चमर्यंत थांबले. तेथून ते 21 ला शिर्डीला आले. एका ठिकाणी गाडी सोडून संशयित गेला आणि काही वेळाने दोन खोके घेऊन आला. एकाला 20 हजार रुपये द्यायचे आहे. पैशांचे खोके पॅक असल्याने ते उघडता येणार नाही, असे सांगून त्याने चालक मोर्या याच्याकडूनच 10 हजार रुपये घेतले. त्यानंतर ते पुन्हा नाशिकमध्ये आले आणि पंचवटी हॉटेलमध्ये थांबले. चालक मोर्याने गाडीभाडे मागितले असता, त्याने रोकड दुसऱ्या साहेबाला द्यायची असून मुंबईत गेल्यावर पैसे देतो असे सांगितले. 

असे फुटले भांडे 
संशयित अमित सिंग याने कोणतेही हॉटेल सोडताना चेकआऊट न करता चावी घेऊनच बाहेर पडला होता. ही बाब चालक मोर्याच्या लक्षात आली. त्याने संशयितासमवेत असलेल्या इसमाला विश्‍वासात घेत चौकशी केली असता तोही ओला कारचा चालक असून 18 जानेवारी ते 16 मार्चपर्यंत त्याचे थकलेले साडेतीन लाख रुपयांचे भाडे नाशिकला देतो म्हणून तो घेऊन आला असल्याचे समजले. त्यामुळे चालक मोर्या याने सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले आणि माहिती दिली.

पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी संशयित अमित सिंग यास ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता तो बोगस आयपीएस अधिकारी असल्याने निष्पन्न झाले. त्यानुसार ओलाचालक मोर्या याची भाडे 1 लाख 72 हजार रुपये आणि 10 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला तर मुंबई नाका पोलिसात हॉटेल एसएसकेची 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

पित्याची इच्छा होती म्हणून... 
संशयित अमित सिंग याच्या पित्याची इच्छा होती की, आपल्या मुलाने आयपीएस अधिकारी व्हावे. त्यामुळे त्याने पित्याला आपण आयपीएस अधिकारी झाल्याचे भासवून त्यांनाही फसवित आला. सदरची बाब पोलीस तपासातून समोर आली आहे. त्याच्याकडून पिस्तुल व बनावट नियुक्ती पत्रासह आधारकार्ड, मोबाईल जप्त करण्यात आला आहे. 
 

Web Title: marathi news officer fraud