काळ्या पिवळ्या ओम्नीच्या रोजीरोटीवर कुऱ्हाड 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

नाशिक: गेल्या 25 ते30वर्षा पुर्वीच्या काळ्या पिवळ्या ओम्नी टॅक्‍सी भंगारात काढण्याच्या प्रादेशीक परीवहन विभागाच्या आदेशाने नाशिक मधील सहा हजार ओम्नी टॅक्‍सी व्यवसायीकांच्या रोजीरोटीवर कुऱ्हाड कोसळणार आहे. 

नाशिक: गेल्या 25 ते30वर्षा पुर्वीच्या काळ्या पिवळ्या ओम्नी टॅक्‍सी भंगारात काढण्याच्या प्रादेशीक परीवहन विभागाच्या आदेशाने नाशिक मधील सहा हजार ओम्नी टॅक्‍सी व्यवसायीकांच्या रोजीरोटीवर कुऱ्हाड कोसळणार आहे. 
  नाशिक मध्ये अगोदर रिक्षा होत्या.1992च्या काळात काळ्या पिवळ्या ओम्नी टॅक्‍सीतुन प्रवासी वाहतुकीस शासनाने परवानगी दिली. काहींनी नव्या व अनेकांनी जुन्या ओम्नी गाड्या विकत घेऊन त्यालाच काळा पिवळा रंग देऊन आरटीओचा प्रवासी वाहतुकीचा परवाना घेतला.व या व्यवसायात पदार्पन केले होते.नाशिक -कासारा, नाशिक -मुंबई, दिडोरी,मालेगाव,शिर्डी पर्यंत या काळ्या पिवळ्या एसटी भाडयात प्रवाशांना सेवा देऊ लागल्या. मात्र कालांतराने वाढते अपाघात, प्रदुषण यांचे संकट उभे उभे राहीले.या कारणावरुन प्रादेशीक परीवहन विभागाने त्याचे खापर या जुन्या ओम्नीवर फोडण्यास सुरवात केली. 

या जुन्या ओम्नींनी भंगारात टाकण्या बाबात निर्णय घेतला आहे.येत्या मे पर्यंत ही जुनी वाहने बदलुन घ्या. असे आदेश देण्यात आले आहे.त्यामुळे नाशिक मधील सहा हजार व्यावसायीकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या उतार वयात ते नवीन ओम्नी विकत घेऊ शकत नाही.तेवढी आर्थीक एैपत नाही. बॅंका त्यांना उभे करत नाही.खासगी वित्तीय संस्था कर्ज देतात.मात्र दिडपट वसुली करतात.असा कटु अनुभव आहे.
या व्यवसाय सध्या भवितव्य राहीलेले नाही.त्यात नवी गाडी घेणार कशी? हा प्रश्‍न त्यांना भेडसावत आहे.वरील निर्णय खात्याने बदलावा. यासाठी संघटनांचे प्रयत्न सुरु आहे.मात्र आद्याप त्याला यश आले नाही. 
'नवीन रोजगार देता येत नसेल तर किमान आहे तो रोजगार तरी हिरावुु नका'. एवढीच अपेक्षा सामान्य ओम्नी चालक व्यक्त करत आहेत. 

या आरटीओच्या निर्णयाने कसेबसे जीवन जगणाऱ्या टॅक्‍सी व्यावसायीकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.शासनाने याचा फेर विचार करणे गरजेचे आहे.नवीन ओम्नी विकत घेण्याची कोणाचीही आर्थीक परीस्थीतीती आज नाही. 
शरद शेलार ( अध्यक्ष नाशिक जिल्हा टॅक्‍सी चालक मालक संघटना) 

Web Title: marathi news omini van