अहो ऐकलंय का...उन्हाळ कांदा पोचला 12 हजारांच्या पुढे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

नाशिक ः उन्हाळ कांद्याची बाजार समितीत एक हजार क्विंटलपेक्षाही कमी आवक होत असल्याने क्विंटलचा भाव 12 हजारांच्या पुढे पोचला आहे. अशातच नवीन पोळ कांदा बाजारात येऊ लागला असून, तो दहा रुपयांहून अधिक किलो भावाने विकत किरकोळ विक्रेते उखळ पांढरे करून घेताहेत. सोमवारी (ता. 2) चंपाषष्ठीनिमित्त भरतासाठी कांदा खरेदी करताना ग्राहकांनी हात आखडता घेतला होता. 

नाशिक ः उन्हाळ कांद्याची बाजार समितीत एक हजार क्विंटलपेक्षाही कमी आवक होत असल्याने क्विंटलचा भाव 12 हजारांच्या पुढे पोचला आहे. अशातच नवीन पोळ कांदा बाजारात येऊ लागला असून, तो दहा रुपयांहून अधिक किलो भावाने विकत किरकोळ विक्रेते उखळ पांढरे करून घेताहेत. सोमवारी (ता. 2) चंपाषष्ठीनिमित्त भरतासाठी कांदा खरेदी करताना ग्राहकांनी हात आखडता घेतला होता. 

कांद्याचे आगर असलेल्या जिल्ह्यातील सर्वाधिक साडेबारा हजार रुपये क्विंटल असा भाव येवल्यात निघाला. तिथे 800 क्विंटल कांद्याची आवक झाली. त्याखालोखाल पिंपळगाव बसवंतमध्ये 11 हजार 300 रुपये क्विंटल भावाने उन्हाळ कांदा सोमवारी विकला गेला. 380 क्विंटल कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला होता. याशिवाय एक हजार 700 क्विंटल कांदा कळवणमध्ये 11 हजार रुपये क्विंटल भावाने विकला. उमराणेत 200 क्विंटल कांद्याला क्विंटलला 11 हजार 51, तर 470 क्विंटल कांद्याला देवळ्यात क्विंटलला 9 हजार 700 रुपये, असा भाव मिळाला. लासलगावमध्ये आठ हजार 152 रुपये, मनमाड सहा हजार 900, नाशिक 8 हजार 251, मुंगसेत आठ हजार 800 रुपये क्विंटल, असा भाव राहिला. दहा हजार रुपये क्विंटलपेक्षा कमी भाव मिळालेल्या बाजार समितीत उन्हाळ कांद्याची गुणवत्ता फारशी चांगली नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 

आवर्जून वाचा- पंकजा,रोहिणी यांना हितशत्रुंनी पाडले

सोलापूरमध्ये 15 हजारांचा भाव

 राज्यात कांद्याला 15 हजार रुपये क्विंटल, असा सर्वाधिक भाव सोलापूरमध्ये मिळाला. पुण्यात नऊ हजार रुपये क्विंटल भावाने कांद्याची विक्री झाली. कोल्हापूरमध्ये 10 हजार, धुळे 10 हजार, राहुरी 10 हजार, नेवासा 10 हजार 500, सातारा 12 हजार 305 रुपये क्विंटल असा भाव कांद्याचा राहिला आहे. दरम्यान, उन्हाळ कांदा संपण्याच्या टप्प्यात पोचला असताना नवीन पोळ कांद्याची आवक सुरू झाली आहे. येवल्यात हा कांदा 8 हजार 250 रुपये क्विंटल भावाने विकला गेला. पण उन्हाळ कांद्याच्या तुलनेत नवीन कांद्याचे भाव कमी असले, तरीही उन्हाळ कांद्याच्या भावाचा लाभ उठविण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांनी विशेषतः शहरांत चढ्या भावाने कांद्याची विक्री केली. 

उन्हाळ कांद्याचा सोमवार(ता. 2)चा भाव (क्विंटलला रुपयांत) 
चेन्नई ः 9 हजार 
बेंगळुरू ः 9 हजार 500 
मुंबई ः 9 हजार 500 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news onion market in nashik