कांद्याच्या नवीन संशोधित वाणाला  6 महिन्यांपासून मान्यतेची प्रतीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

नाशिक ः चितेगाव फाटा येथील राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन तथा विकास प्रतिष्ठानतर्फे संशोधित केलेल्या कांद्याचे नवीन वाण केंद्रीय समितीच्या मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे. प्रतिष्ठानने एल-819 वाणाचा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी समितीला पाठवला आहे. वाणाला मान्यता मिळाल्यानंतर त्याच्या बिजोत्पादनाची प्रक्रिया सुरु होऊन शेतकऱ्यांच्या हातात नवीन वाणाचे बियाणे पोचेपर्यंत किमान वर्षभराचा कालावधी अपेक्षित आहे. 

एकरी 160 क्विंटलच्या आसपास उत्पादन मिळेल अशा लाल 4- एल 744 वाणाचे प्रतिष्ठानतर्फे बिजोत्पादन सुरु करण्यात आले आहे. बिजोत्पादन करार पद्धतीने शेतकऱ्यांकडून करुन घेण्यात येत आहे. महाराष्ट्रातील बिजोत्पादनातून उपलब्ध होणारे या वाणाचे बियाणे राज्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात मिळणार आहे. यंदा कमी प्रमाणात नवीन वाणाचे बियाणे उपलब्ध होणार असून पुढील वर्षापासून बियाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल, असे प्रतिष्ठानच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. प्रतिष्ठानतर्फे इतर वाणाचे बिजोत्पादन महाराष्ट्राबरोबर गुजरात, मध्यप्रदेशात केले जाते. 

चीनपाठोपाठ भारतात उत्पादन 
चीनच्या पाठोपाठ भारतामध्ये कांद्याचे उत्पादन 9 लाख 59 हजार हेक्‍टरवर घेतले जाते. 1 कोटी 63 लाख 9 हजार टनापर्यंत उत्पादन होते. भारतातून घरगुती वापर पूर्ण होऊन 13 ते 15 लाख टन कांद्याची निर्यात होते. ही निर्यात 3 हजार कोटींपर्यंत होते. भारतामध्ये हेक्‍टरी 17.01 टन कांद्याची उत्पादकता आहे. मात्र ही उत्पादकता अमेरिका आणि चीनच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामागे कमी कालावधीत वाणांचे कमी उत्पादक क्षमता, बरेचसे वाण कीड-रोगांसाठी संवेदनशील, काढणी पश्‍च्यात होणारे नुकसान अशी सारी कारणे त्यामागे आहेत.

या समस्यांच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिष्ठानने गेल्यावर्षी लाल 4- एल 744 वाण खरीप आणि रब्बी हंगामासाठी शिफारस केला आहे. 7 ते 8 किलो बियाणे एकरासाठी पुरेसे ठरते आणि लागवडीनंतर सर्वसाधारणपणे चार महिन्यात कांदा काढणीला येतो. गोल आणि गडद लाल रंगाचा हा कांदा आहे. केंद्रीय समितीच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत असलेला एल-819 हा वाण सुद्धा शेतकऱ्यांच्यादृष्टीने उपयुक्त ठरणारा आहे. 

Web Title: marathi news onion new vaan