आऊटसोर्सिंगने सफाई कर्मचारी भरतीला ब्रेक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

नाशिक - शहरातील पुर्व व पश्‍चिम विभागातील रस्ते स्वच्छतेसाठी आऊटसोर्सिंगने सफाई कर्मचारी भरती करण्यासाठी काढलेली निविदा रद्द करण्यात आली असून मानधन किंवा रोंजदारीवर सफाई कर्मचारी भरती करण्याचा ठराव प्रशासनाला सत्ताधारी भाजपने दिल्याने मानधनावर सातशे सफाई कर्मचारी भरती होणार आहे. 

वाढत्या लोकसंख्येला सफाई कर्मचारी अपुरे पडतं असल्याने आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून 700 सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात महासभेवर सादर करण्यात आला होता. नगरसेवकांनी आऊटसोर्सिंगला विरोध करतं मानधन किंवा रोजंदारीवर भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी महासभेकडून प्रशासनाला ठराव देताना मानधन किवा रोजंदारीवर भरती करण्याचे आदेशित करताना आयुक्तांना सर्वाधिकार प्रदान केल्याचे नमुद केल्याने ठरावाबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

आयुक्तांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ऑक्‍टोंबर महिन्यात आऊटसोर्सिंगने सफाई कर्मचारी भरती करण्यासाठी निविदा काढली. महासभेने आऊटसोर्सिंगला विरोध केल्यानंतरही प्रशासनाने निविदा काढल्याने विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली. परंतू प्रशासनाने दखल घेतली नाही. मुंढे यांची बदली झाल्यानंतर पुन्हा आऊटसोर्सिंग निविदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने ठरावाचा विपर्यास केल्याचा दावा करतं सत्ताधारी भाजपने देखील निविदा प्रक्रियाचं रद्द करण्याचा निर्णय घेत रोजदांरीवर किंवा मानधनावर सफाई कर्मचारी भरती करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. 
 
Web Title: marathi news outsource safai worker