कोरोनाबाबत सोशल मिडीयावर खोटा संदेश; दोघांविरुद्ध गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

व्हॉटस्‌ऍपवर कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडला असून सावधान..अशा आशयाचा संदेश प्रत्येक ग्रुपवर फिरू लागला होता. यामुळे नागरीकांमध्ये भिती निर्माण झाली होती.

पाचोरा ः कोरोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार निर्माण केला असून, जिह्यात संशयीत आढळून आले असून सुदैवाने पॉझिटीव्ह रूग्ण अद्याप आढळून आलेले नाही. तरी देखील पाचोरा शहरात कोरोना पॉझिटीव्ह असलेला एक जण फिरत असल्याचा खोटा संदेश सोशल मिडीयावरून व्हायरल केला. याप्रकरणी दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी आज जनता कर्फ्यू पाळण्यात आला. यामुळे सर्वत्र शांतता होती. सर्व नागरीक घरातच थांबलेले होते. घरात थांबून सारेजण मोबाईलवर अपडेट पाहत होते. अशात व्हॉटस्‌ऍपवर कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडला असून सावधान..अशा आशयाचा संदेश प्रत्येक ग्रुपवर फिरू लागला होता. यामुळे नागरीकांमध्ये भिती निर्माण झाली होती. यामुळे प्रशासन देखील हादरले होते. परंतु याचा शोध घेतला असता संदेश खोटा असल्याची खात्री झाली. 

दोघांचा घेतला शोध 
सोशल मीडियावर पाचोरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह सापडला. गंगा सुपरचा मुलगा सावधान.. अशा आशयाचा इंग्रजी भाषेतील खोटा व भिती निर्माण करणारा संदेश व्हायरल करण्यात आला. त्यामुळे शहर व तालुक्‍यातील नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली. पोलीस हवालदार सुनील पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रवीण बच्छाव (गाडगेबाबानगर पाचोरा) व दत्तू पाटील (जारगाव, ता. पाचोरा) या दोघांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राहुल सोनवणे करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora corona virus social media fraud massage create two boy police case