बिल्दी ग्रामस्थांचा दारूबंदीसाठी पोलीस ठाण्यात एल्गार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

पाचोरा : बिल्दी ता.

पाचोरा : बिल्दी ता. पाचोरा येथील संतप्त ग्रामस्थ स्त्री पुरुषांनी अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यात येऊन एल्गार केला दारूबंदी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा व त्याला वेगळे वळण लागल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे जळगाव रस्त्यावरील बिल्दी हे गाव बहुळा धरणामुळे स्थलांतरित झाले असून गावातील बहुतांश शेतकऱ्यांना धरणात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळालेला आहे त्यामुळे अनेक जण दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले आहेत गावातील तरुण पिढी देखील सकाळपासून सायंकाळपर्यंत दारूच्या नशेत राहते दारूबंदी करावी अशी मागणी अनेकदा पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली पोलिसांनी किरकोळ स्वरूपाच्या कारवाया केल्या परंतु दारूबंदी संदर्भात कठोर पाऊल उचलले नाही त्यामुळे गावातील अवैध दारूविक्री बंद न होता त्यात उलट दिवसागणिक वाढ होत आहे त्याचा परिणाम गावातील शांतता नष्ट होण्यात झाला असून दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत व होत आहेत तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे हे असेच चालू राहिल्यास सारे गाव उद्ध्वस्त होण्याची वेळ येईल असे चित्र आहे 
अवैध दारूविक्री बंद होत नसल्याने ग्रामस्थ प्रामुख्याने महिला वर्ग कमालीचा त्रास ला असून या महिलांनी पुढाकार घेऊन दारूबंदीचा एल्गार केला 28 रोजी सकाळी महिलांनी एकत्रितपणे गावात व गावालगत फिरून दारू भट्ट्या उद्ध्वस्त केल्या तेथील सर्व सामान जमा करून त्या सामानासह महिला व पुरुष पोलीस ठाण्यात आले व त्यांनी दारू विक्री बंद करा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा व गावातील शांतता अबाधित ठेवा अशा घोषणा देत पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना निवेदन दिले यावेळी ग्रामस्थांनी काही वेळ पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला व न्यायाची मागणी केली  दारूबंदी करून न्यायाची मागणी या महिलांनी केलीे  पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी ग्रामस्थांना दारू पाडणाऱ्या व विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त झालेले ग्रामस्थ माघारी परतले याबाबत देण्यात आलेल्या निवेदनावर सरपंच निलेश पाटील संदीप पवार समाधान पाटील गजानन पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत पोलीस ठाण्यात येऊन एल्गार करणाऱ्या बिल्दी. येथील ग्रामस्थांमूळे पोलिस प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली

Web Title: marathi news pachora jalgaon darubandi