दुसखेडा येथील तरुण शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

नांद्रा (ता.पाचोरा) ः दुसखेडा (ता.पाचोरा) येथील तरुण शेतकरी विजय बाबुराव पाटील (वय41) यांनी रविवारी (ता.17) मध्यरात्री दुसखेडा- कुरंगी शिववर असलेल्या शेतातील निबांच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना आज सकाळी शिवारातील शेतकरी शेतात गेले असताना उघडकीस आली. 

दुसखेडा येथील रहिवासी असलेले विजय पाटील यांच्याकडे दोन एकर शेती आहे. ठिबक सिंचनवर कापूस पिकाची लागवड केली आहे. मुलगी ही बाळंतपणासाठी माहेरी आली असून, डॉक्‍टरांनी दोन दिवसावर मुलीच्या बाळांतपणाची तारीख दिलेली आहे. जेमतेम पाण्यावर कापसाचे पिक जगवण्याच्या धडपडीत पैशांची अडचण जाणवत होती. गेल्या काही दिवसांपासून पैशांची अडचण भेडसावत होती. त्यांनी 2016-17 साली पाचोरा येथील विजया बॅंकेकडून एक लाख रुपयांचे बागायत पिक कर्ज घेतले होते. त्यात कापसावर बोंळअळीमुळे अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. या विवंचनेतच विजय पाटील यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. अत्यंत मेहनती प्रामाणिक म्हणून विजय पाटील यांची ओळख होती. त्यांच्या आत्महत्येमुळे दुसखेडा गाव सुन्न झाले आहे. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी असा परीवार आहे. पोलिस पाटील शामकांत पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास बिट अंमलदार हिरामन चौधरी, सचिन पाटील करत आहेत.
 
Web Title: marathi news pachora jalgaon former sucide