मोटारसायकल अपघातात पती ठार; पत्नी गंभीर जखमी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

पाचोरा ः वरखेडी रस्त्यावरील सिंधीकॉलनीजवळ मोटरसायकलीला पिकअपच्या धडकेने मोटार सायकलस्वार शकिल मन्यार (वय 39) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली. मयत शकिलची पत्नी रियानाबी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पाचोरा येथे उपचार सुरू आहेत. 

शकील मन्यार हे पत्नी रियानाबी मोटारसायकलने पाचोऱ्याकडे येत होते. सिंधी कॉलनीजवळ पिकअप गाडीची मोटारसायकलला धडक लागल्याने दोघेही फेकले गेले. शकील रस्त्यावर पडून डोक्‍याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत झाला. त्यांची पत्नी रियानाबी मन्यारला गंभीर दुखापत झाली असून पाचोरा येथे उपचार सुरू आहेत. शकीलच्या अपघाताची व मृत्यूची वरखेडी येथे वार्ता कळताच मन्यार परिवाराने प्रचंड आक्रोश केला. मयत शकील यांच्या पश्‍चात आई व चार मुले असा परिवार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora motar ciycal accidend 1 death

टॅग्स