निलगायींचा पाणी, चाऱ्यासाठी शेत शिवारात मुक्तसंचार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

नांद्रा (ता.पाचोरा) ः नांद्रा (ता. पाचोरा) येथील वनपरीक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वन्यप्राणी आहेत. या परिसरातील वन विभागात सात धरणे असल्याने वन्यप्राणी नजरेस पडत असतात. यात निलगायींचा परिसरात मुक्‍तसंचार आहे. 

उन्हाळा असल्याने दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. जिल्ह्यात पाणी टंचाई असताना, रानात वास्तव्य करणाऱ्या प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू असते. नांद्रा (ता. पाचोरा) परिसरातील वन विभागाच्या परिक्षेत्रात निलगायींचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे याकरीता पाच कुत्रिम पाणवाठे तयार करण्यात आले आहेत. परंतु जंगलात मानवाने अतिक्रमण केल्याने वन्य प्राण्यांच्या धरणांवर व तळ्यांवर पाळीव प्राणी वावरतात. येथील पाणी साठे संपवतात गेल्या आठवड्यापासुन या वनविभागातील कुत्रिम पाणवठ्यात अधुन- मधुन पाणी टाकले जात आहे. खासगी विहिरीवरुणही कोणी देत नसल्यामुळे वन्यप्राणी पाण्यासाठी फिरत आहेत. शेती शिवारातील रान मोकळे असल्यामुळे पाणी व चारा कुठेही उपलब्ध नसल्यामुळे वन्यप्राणी शेतांमधे फिरतांना दिसत आहे. कापसाची लागवड झाल्यावर वन्य प्राण्यांसाठी शेतकऱ्यांना जागता पहारा द्यावा लागतो.

Web Title: marathi news pachora nilgay water