विवाहितेवर  बलात्कार प्रकरणी दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

पाचोरा : येथील 20 वर्षीय विवाहितेला रिक्षात बसवून अज्ञात ठिकाणी नेऊन तिचेवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना शुक्रवार ता. 19 रोजी सायंकाळी उशिरा घडली याप्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे हे दोघे संशयित नराधम पाचोरा येथीलच आहेत

पाचोरा : येथील 20 वर्षीय विवाहितेला रिक्षात बसवून अज्ञात ठिकाणी नेऊन तिचेवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना शुक्रवार ता. 19 रोजी सायंकाळी उशिरा घडली याप्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे हे दोघे संशयित नराधम पाचोरा येथीलच आहेत
याप्रकरणी सूत्रांकडून माहिती अशी की येथील हनुमान नगरात राहणारी विवाहिता उमा  (नाव काल्पनिक) जारगाव चौफुलीवरील एका रुग्णालयात साफसफाईचे काम करते ती शुक्रवार ता 19 रोजी सायंकाळी आपले काम आटोपून जारगाव चौफूली कडून आपल्या घराकडे जात असताना तिला याच भागात राहणाऱ्या दोघांनी काहीतरी खोटे कारण सांगून रिक्षात बसवुन अज्ञातस्थळी नेले व तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करून त्याच रिक्षाने तिला जारगाव चौफूली भागात  सोडून दिले व ते दोघे संशयित निघून गेले 
पीडित विवाहितेने हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितल्यावर त्यांनी सरळ पोलीस ठाणे गाठले  पीडीत  विवाहितेने पोलिसांसमोर आपबिती मांडली ती त्या दोघांना ओळखत असल्याने तिने त्यांचे संदर्भात पोलिसांना माहिती दिली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री उशिरा दोघांना त्यांच्या घरूनच ताब्यात घेतले त्यात गोविंद पुजारी व नुरा पटेल (रिक्षाचालक )यांचा समावेश आहे  पीडित विवाहितेसह दोघा संशयितांची वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे व पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दोघा संशयितांच्या घरी व घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली व परिस्थिती नियंत्रित ठेवली पोलिसांनी एम एच 19 व्ही 6824 या क्रमांकाची गुन्ह्यात वापरलेली रिक्षा ही जप्त केली आहे पीडित विवाहितेचे पती मोलमजुरी करतात गेल्या वर्षीच पीडितेचा विवाह झालेला आहे पुढील तपास उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे करीत आहेत .

Web Title: marathi news pachora woman rape 2 arrest