esakal | सकाळ विशेष-खैके पान.... नाशिकवाला! पानाची लाली आजही कायम... 
sakal

बोलून बातमी शोधा

live

सकाळ विशेष-खैके पान.... नाशिकवाला! पानाची लाली आजही कायम... 

sakal_logo
By
संतोष घोडेराव,सकाळ वृत्तसेवा

अंदरसुल- नवरात्र,लग्न समारंभ सत्यनारायण, महापूजा या सारख्या विविध महत्त्वपूर्ण पूजेला नागलीच्या पानाने सुरुवाती पासूनच आपले महत्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. अतिशय गुणकारी आणि उपयुक्त असलेल्या नागलीच्या पानामुळे रोडलगत, गावांतर्गत विविध ठिकाणी पान दुकान उभारून कित्येकांच्या हाताला एक हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे.

संपुर्ण राज्यामध्ये गुटखाबंदी केली असतांना ही   तालुक्यांसह जिल्ह्यात सर्रासपणे गुटखा विक्री होत असल्याने पान टपरीची जागा आता गुटखा टपरीने घेतल्याने गावोगावी पान टपऱ्या नव्हे तर गुटखा टपऱ्यावर दिसू लागल्या आहेत.
  अजून ही काही पान दुकानदारांनी आपल्या पान दुकानाची क्रेज कायम टिकून ठेवली आहे.त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे येवला तालुक्यातील थेटर रोडवर असलेल्या बिलाल पान दुकानची आज ही ख्याती आहे.

अजून ही जुने जाणते व पान खाणारी पिढी टिकून आहेत.नव्या पिढीमध्ये तरुणांसह तीस ते चाळीस वयोगटात असलेला वर्गात ही पान खाण्याची क्रेज आज ही कायम आहे. भोजनानंतर हमखास फेरफटका मारण्याच्या निमित्ताने पान दुकानातून पान खाल्ले की ते जेवण पचनासाठी व रक्तवाढीला त्याचा मोठा फायदा होतो.म्हणून आज ही पान टपरीवरील पान अजून ही पूर्णपणे लुप्त झाले नाही परंतु त्याची क्रेज कमी झाली आहे.मात्र मानवी शरीराला गुणकारी असलेला पान टपरीवरचा पानाचा मुख्य मेनू विकण्या ऐवजी शरीराला अपायकारक असलेला गुटखा विक्रीच जास्त होतांना दिसत आहे. विशेष म्हणजे मारवाडी,गुजराथी,भैया आणि मुस्लिम या समाजातील लोकांमध्ये पान खाण्याची जास्त क्रेज अजुन ही टिकून आहे.

अशी आहे नागलीच्या पानांची बाजारपेठ
चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथे नागलीचे पानमळे आहेत.पानाचे मोठे उत्पादन होत नसले तरी ही चांदवड आणि इतर भागातील बाजारपेठ टिकून आहे. शुक्रवारी श्रीरामपूर तर रविवारी चांदवड या दोन्ही ठिकाणी नागलीच्या पानाची मुख्य बाजारपेठेत भरत असते. या दोन्ही ठिकाणी ठरलेल्या दिवशी तब्बल पन्नास लाखाहून अधिक पाने विक्रीसाठी येत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातुनच नव्हे तर राजकोट ,बिहार सारख्या विविध राज्यातून ही व्यापारी नागलीचे पान खरेदी करण्यासाठी येत असतात. लहान पेटारे अडीज हजार,मोठे पेटारे पाच हजार ,दहा हजार या प्रमाणे नागलीच्या पानांची सुरक्षित पॅकिंग केली जात असून वीस पैसे ते एक रुपया पर्यंत प्रति पानाला आलेल्या मालाच्या आवक नुसार भाव मिळतो.

    विशेष म्हणजे नागलीच्या पानाबरोबर बनारस कलकत्ता, देशी ,मगई ,जगन्नाथपुरी यासारखे विविध पान ही पान दुकानावर विकले जातात.कलकत्ता आणि बनारसहुन रेल्वेने आलेल्या मुंबई येथील महम्मद आली रोड नळ बाजार येथे कलकत्ता ,बनारस पानांची मोठी बाजार पेठेत भरत असते. कलकत्ता पानाला तीनशे पानाच्या डोलीला दोनशे ते अडीचशे रुपये ,तर मगई पानाच्या डोली दोनशे ते अडीचशे रुपये भाव आहे. शेकड्यात मिळणाऱ्या बनारस पानाला शंभर ते दीडशे रुपये प्रति शेकडा मिळत असल्याने तेथील मेन डीलरच्या माध्यमातून डोलीच्या रूपानं  प्रत्येक जिल्ह्याला मागणी नुसार सबडीलरच्या माध्यमातून वितरित करून तालुका निहाय गावोगावी पान दुकान पर्यंत पानाचा मला मागणी नुसार पोहच केला जातो.

"मिठा मसाला पान खाल्ले तर जेवण पचनासाठी आणि रक्तवाढीसाठी चांगले असते.साकारपूडा, लग्न समारंभ आणि वाढदिवसाला ही मागणी प्रमाणे पानांची ऑर्डर दिली जाते.खास करून शिर्डीला नेहमी जास्त पानांची ऑर्डर असते " 
बिलाल अन्सारी,येवला पान दुकानदार

loading image
go to top