पंचवटीत चक्क टॅंकरने पाणीपुरवठा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

पंचवटीः शासनाकडून तीव्र दुष्काळी भागात टॅंकरने पाणीपुरवठ्याच्या बातम्या आपण नेहमी वाचतो. पण गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठाच होत नसल्याने पंचवटीतील शनीचौकात आज सकाळी चक्क टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याने पाणीकपातीनंतर आता गावठाण भागातील पाणीप्रश्‍न तीव्र झाल्याचे दिसून येते. नाशिक शहर हे सात टेकड्यांवर वसलेले शहर असल्याने गावठाणभागात मोठ्या प्रमाणावर चढउतार आहेत. गंगापूर धरणात जेमतेम पाणी शिल्लक असल्याने मनपा प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून एकवेळचा पाणी पुरवठा सुरू केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news panchvati water suppy