भावी मुख्यमंत्री भाजपचा - राज्य प्रभारी सरोज पांडे, युतीत रंगणार कलगीतुरा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

नाशिकः आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात युतीची सत्ता येऊन मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा दावा शिवसेनेकडून झाला असतानाच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनी कोणाचा कल्पनाविलास काहीही असला तरी मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी चांगली असल्याचा दावा करताना तेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. मुख्यमंत्री पदावर शिवसेना व भाजपमध्ये कलगीतुरा रंगल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. 
   
  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संघटनात्मक बांधणी व सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यासाठी श्रीमती पांडे नाशिकमध्ये आल्या आहेत. सकाळच्या सत्रात शहर व दुपारच्या सत्रात त्यांनी ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला. या वेळी माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, की केंद्रात नरेंद्र, तर राज्यात देवेंद्र यांच्यावर मतदारांचा विश्‍वास आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजपचीच सत्ता येईल. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती झाली होती. विधानसभा निवडणुकीतही युती म्हणूनच निवडणूक लढविली जाईल. युती म्हणून निवडणूक लढविली तरी मुख्यमंत्री भाजपचाच राहील, असा दावा त्यांनी केला. 
   
यापूर्वी शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा दावा केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस घेतील, असे जाहीर केले होते. आता भाजपच्या प्रभारी सरोज पांडे यांनी भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केल्याने मुख्यमंत्री पदावरून युतीत वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात विरोधी पक्ष निष्प्रभ झाला असून, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक लोक भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचा दावाही पांडे यांनी केला. 
.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pande meeting bjp