पपया नर्सरीच्या अकाउंटंटकडून  सव्वानऊ लाखांना गंडा 

residentional photo
residentional photo

नाशिक : त्र्यंबक रोडवरील पपया नर्सरीच्या अकाउंटंटने गार्डन मेन्टेनन्सच्या कामात सुमारे नऊ लाख 20 हजारांचा गैरव्यवहार करून गंडा घातला. याप्रकरणी संशयित अकाउंटंट अनिलगीर गोसावी (रा. जाधव संकुल, सातपूर) याला अटक केली आहे. 
मंगेश तिडके (रा. संदीपनगर, सातपूर) यांची पपया नर्सरी आहे. त्यांच्याकडे संशयित अनिलगीर गोसावी अकाउंटंट व गार्डन मेन्टेनन्स हेड म्हणून काम पाहत होता. संशयित गोसावीने ग्राहकांनी दिलेले गार्डन मेन्टेनन्सचे पैसे नर्सरीत जमा करणे अपेक्षित होते. मात्र, संशयित गोसावीने 2015 ते 15 सप्टेंबर 2018 दरम्यान गार्डन मेन्टेनन्सचे पैसे कंपनी वा मालकाकडे जमा न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापर केला. संशयिताने सुमारे नऊ लाख 20 हजार 228 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले. याप्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. संशयित गोसावीला गुरुवारी (ता. 15) रात्री अटक केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com