आमदारांनी बुजविले स्वत: बसस्थानकातील खड्डे 

संजय पाटील
मंगळवार, 9 जुलै 2019

पारोळा ः पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासुन बसस्थानक परिसरात खड्डे व चिखल झाला आहे. प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून. स्वत: आमदार डॉ. सतीष पाटील यांनी पदरमोड करित आज (ता.9) सकाळी बसस्थानकातील खड्डे बुजविण्याचे काम केले. जेसीबी व डंपरच्या सहाय्याने मुरूम आणून श्रमदान करत खड्डे बुजविली. 

पारोळा ः पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासुन बसस्थानक परिसरात खड्डे व चिखल झाला आहे. प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून. स्वत: आमदार डॉ. सतीष पाटील यांनी पदरमोड करित आज (ता.9) सकाळी बसस्थानकातील खड्डे बुजविण्याचे काम केले. जेसीबी व डंपरच्या सहाय्याने मुरूम आणून श्रमदान करत खड्डे बुजविली. 
पावसाळ्यात बसस्थानकात चिखल मोठ्या प्रमाणात होत असतो. यामुळे वयोवृद्ध प्रवाशांसह सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत प्रशासनाने दखल घेतली नाही. पारोळा मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार डॉ. पाटील यांनी स्वखर्चाने बसस्थानकातील खड्डे बुजवलीत. यावेळी त्यांनी स्वत: श्रमदान करित खड्डात मुरुम टाकला. 
राज्यात युतीचे सरकार असून, एसटी महामंडळाचे मंत्री दिवाकर रावते यांनी बसस्थानकाच्या अडीअडचणी सोडविल्या पाहिजे. परिसर क्रॉंक्रिटीकरणासाठी निधी असतांना देखील हे काम रेंगाळत पडले आहे. याबाबत एसटी महामंडळाने पाठपुरावा करावा अन्यथा आपण आपल्या आमदार निधीतून तात्काळ 5 लाखाचा निधी देवु शकतो; असे देखील आमदार पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी जि. प. सदस्य रोहन पाटील, हिंमत पाटील, डॉ. शांताराम पाटील, डिगंबर पाटील, नगरसेवक रोहन मोरे, यशवंत पाटील, योगेश रोकडे, संजय बागडे, ईश्वर पाटील, अभिषेक पाटील, डि. के. पाटील, भैय्या माने, अंकुश भागवत यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते. 

वाढीव बिलाबाबत घालणार पालकमंत्रींना घेराव 
जिल्ह्यासह पारोळा व मतदार संघात विजबिलवाढीच्या व स्मार्ट मीटरबाबत तक्रारी येत आहे. याबाबत भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी आंदोलने करित आहे. युतीचे सरकार असतांना पदाधिकारी यांना निवेदन देवु आंदोलन करावे लागते हि शोकांतिका आहे. याबत पालकमंत्री यांनी तात्काळ ऊर्जामंत्र्याशी बोलुन विजदरवाढीचा विषय मार्गी लावायला हवा होता. परंतु तसे झाले नाही. परंतु जिल्हयात राष्टवादी कॉंग्रेस पालकमंत्री यांना प्रश्न सोडविणेबाबत विचारणा करणार असल्याचे डॉं पाटील म्हणाले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news paroda MLA satish patil bus stand damege graound