वांग्याने केला वांधा 

 eggplant
eggplant

पारोळा : शहरातील आडत्यांकडे वांग्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी शेतकऱ्यांना वांगी अत्यल्प भावात द्यावी लागत असून, वांग्याने चांगलाच वांधा केल्याची स्थिती आहे. शिरसमणी येथील एका स्वत:च विक्रेता होऊन आपली वांगी कमी किंमतीत विक्री केली हे विशेष 
शिरसमणी येथील शेतकरी संजय जगन्नाथ पाटील यांनी पारोळ्यात आडत दुकानावर आपली वांगी विक्रीस आणली होती. मात्र, वांग्याची आवक आज वाढल्याने १६ ते १७ किलो वजनाचे कॅरेट कमी किंमत मिळत असल्याचे पाहुन स्वत: शेतकरी संजय पाटील यांनी बाजारपेठ परिसरात वांगे विकले. यावेळी बाजारपेठ लगत असलेल्या शॉपिंग दुकानातील व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडून वांगी खरेदी करुन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 
रात्र- अपरात्री शेतात जाऊन जिवाची पर्वा न करता शेतातील उत्पन्न वाढणेसाठी महागडी फवारणी करायची, मशागतीसाठी स्वत: मेहनत घेऊन मजुरांच्या सहाय्याने किंवा कुटुंबातील सदस्यांना सोबत घेत भाजीपाला काढायचा. तो भाजीपाला बाजारपेठेत आणताना वाहनांची शोधाशोध करीत लगबगीने सकाळी बाजारपेठ गाठायचे अन् लिलावात तो माल विक्री नेतात. घाम गाळून शेतकरी जेमतेम उत्पन्न घेतो. परिणामी त्यांना समाधानकारक भावाची अपेक्षा असते. वाढत्या स्पर्धेत मालास मिळणारा भाव पाहून शेतकरी निराश होताना दिसत आहे. 

वांगी दिली तीन रुपये किलो 
लिलावात वाढत्या आवकीमुळे शेवटी शेतकरी संजय पाटील यांनी निराश होऊन आपली वांगी तीन रुपये किलो दराने विकून मिळालेल्या मोबदल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी शहरातील व्यापारी रशमीशेठ पटेल, प्रभाकर राठोड, अनिल पाटील, आधार पाटील, विलास महाजन, मनोज पाटील, राजेंद्र अमृतकर, भुजंगराव मराठे, संजय पाटील या सर्वांनी शेतकऱ्यास दिलासा मिळावा म्हणून वांगी खरेदी केली. 

पंचायत समिती केंद्र असावे ः शेतकरी संघटना 
तालुक्यातील बहुतांशी शेतकरी हे शेती पिकावर अवलंबून आपला चरित्रार्थ भागवितात. मात्र, शेतकऱ्यांना कोणते पीक कोणत्या वेळी घ्यावे याबाबत मार्गदर्शन मिळत नसल्याने उत्पन्नाचा दर्जा घसरल्याचे सर्वत्र जाणवत आहे. याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केंद्राची गरज आहे. मात्र, मार्गदर्शन केंद्र हे तालुका कृषी कार्यालयात आहे. बरेचशे शेतकरी हे कार्यालय लांब असल्याने जाणे टाळतात. यासाठी पंचायत समिती आवारात शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र असावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी केली आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com