उत्रळ शिवारात कडब्याला अचानक आग; अनर्थ टळला 

fire
fire

पारोळा (जळगाव) : उत्रळ (ता. पारोळा) शिवारातील नगरसेवक कैलास चौधरी यांच्या एकविरा पेट्रोल पंपाजवळील शेतात अचानक आग लागल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे 30 ते 40 हजाराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आग आटोक्‍यात आणण्यात यश मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. शेतकरीसह अनेकांनी त्यांच्या ह्या जिद्दीचे कौतुक केले. 


उत्रळ शिवारातील शेतकरी मोगल बेग यांनी शेतात दुभत्या जनावरांसाठी ज्वारीचा कडबा व चाराकुट्टी जमा करुन ठेवला होती. शेताचे काम आटोपून ते घराकडे आले. मात्र सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शेतातील कडब्यास अचानक आग लागल्याचे समजताच त्यांनी शेताकडे धाव घेतली. सदर घटनेची माहिती नगरसेवक भैय्या चौधरी यांना कळताच त्यांनी पंचशिल मित्र मंडळातील सदस्य भिका अहिरे, दिपक वानखेडे, राजु सरदार, पिंटु वानखेडे, आनंद अहिरे, किशोर वानखेडे, राजु वानखेडे यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न केले. 

दहा मिनिटात अग्निशमक बंब 
ऐन उन्हाच्या तडाख्खात व सर्वत्र मोकळे रान असल्याने आगीने काही क्षणातच रुद्र धारण केले. नगरसेवक भैय्या चौधरी यांनी घटनेची माहिती नगराध्यक्ष करण पाटील यांना सांगताच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या दहा मिनीटातच अग्नीशामक बंब शेतात आणत आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घटनेची माहीती महसुल विभागास देण्यात आली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com