पाच वर्षाची चिमुरडी ती...धावली, ओरडली अन्‌ बहिणीला वाचविले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

धाबे (ता. पारोळा) या आदिवासी भिल्ल वस्तीतील हा थरार आज घडला. पाच वर्षाच्या चिमुकलीने प्रसंगावधान दाखवून केलेल्या कामाने एका मुलीचा जीव वाचू शकला. जर ही चिमुकली धावत खाली गेली नसती आणि मंदीरावर बसलेल्या लोकांना हाक मारून बोलावले नसते तर; पुढील घटना ही एक नव्हे तर दोन जीवांचे प्राण जावून आक्रोश करणारी राहिली असती. 

पारोळा : धुतलेले कपडे सुकविण्यास धाब्यावर (गच्ची) चढली. तशाच ओल्या हातांनी पाण्याच्या मोटारीच्या पाईपावर असलेले कपडे काढण्यास गेली. त्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहाने ओढली जावून चिटकली. तिच्या सोबत असलेल्या त्या पाच वर्षाच्या चिमुकलीने प्रसंगावधान राखत आरोळ्या मारत लोकांना बोलाविले आणि विद्युत प्रवासाहाचे मेन स्विच बंद करण्याची खूण करून सांगितले. यामुळेच आपल्या मोठ्या चुलत बहिणीचे प्राण वाचवू शकली. 

धाबे (ता. पारोळा) येथील आदीवासी वस्तीत विजेच्या शॉकपासून वाचविल्याची घटना आज घडल्याने. पाच वर्षाच्या चिमुरडीच्या धाडसाचे ग्रामस्थांनी कौतुक करत जीव मरणाच्या घटनेचे साक्षीदार झालेत. धाबे शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे, वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील, निवृत्त प्रा. विकास सोनवणे यांनी शितलच्या घराला भेट देवुन सायलीच्या हिंमतीचे कौतुक केले. 

नक्‍की पहा - कानात हेडफोन लावला...अन्‌ डॉक्‍टरने केली आत्महत्या ! 

शितलताई पडली...आई ये गं... 
किराणा व्यावसायिक दिपक माणकू भिल यांची मुलगी शितल (इयत्ता 10 वी) ही गजानन हायस्कुल पारोळा येथे शिक्षण घेते. सकाळी नळाला पाणी आल्याने घरातील नित्य वापराचे कपडे धुवुन ती गच्चीवर कपडे सुकण्यास टाकण्यासाठी गेली होती. अंगावरील ओल्या कपड्यानिशी तिने पाण्याच्या मोटारीजवळील पाईपावर पडलेले स्वतःचे कपडे घेण्यास गेली. परंतु, त्या पाईपात विद्युत प्रवाह सुरु असल्याने पाण्याच्या मोटारीकडे ओढली जाऊन चिटकली. याच वेळी सायली उर्फ चिवु भिल (वय 5 वर्ष) हिने शितलताई पडली म्हणुन जोरात आरोळ्या मारुन मागच्या घरात असलेल्या शितलच्या आईला बोलाविले. सायलीची आरोळी ऐकून त्या धावत आल्या. अनावधानाने शितलला उचलायला गेल्या तर त्याही झटका बसून दुर फेकल्या गेल्या. यात त्यांच्या डोक्‍याला भिंतीचा मार बसला. 

हेही पहा -  आहो आश्‍चर्यच ना ! शेजारणीने दिला त्रास...अन्‌ बकरी पोहचली पोलिस ठाण्यात

अन्‌ चिवू पडाली खाली 
सर्व घडला प्रकार काही अल्प मिनिटांचा होता. पण यात देखील सायलीने दाखविलेले प्रसंगावधान काळजाचा ठोका चुकविणारेच होते. वास्तविक सायलीच्या वयोमानानुसार तिने दाखविलेली हिंमत खुप मोठी होती. शितलला बसलेला विद्युत शॉक आणि तिला वाचविण्यात फेकली गेलेली तिची आई...हे चित्र पाहून सायली न घाबरता बाहेर पळाली. अंगणात समोरच छोट्या दुकानावर व मारूती मंदिराच्या ओट्यावर बसलेल्या लोकांना तिने आवाज दिला. सारेजण घरात पळत आले. यावेळी सायलीने प्रथम विद्युत प्रवाहाचे बटन बंद करण्याची खुण केली. यावेळी गावकऱ्यांनी विद्युत प्रवाह बंद केला. नंतर गच्चीवर धाव घेत शितलला उचलुन पलंगावर टाकले. शितल बेशुध्द असल्याने घरात साऱ्यांची रडारड सुरू झाली. तेथे शेजारी उपस्थित डॉ. प्रकाश काटे यांनी थेरेपी व प्रथमोपचार केल्याने तीच्या प्रकृतीचा धोका टळला होता. यानंतर तिला उपचारासाठी पारोळा रवाना केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola five year girl sister save lives line currant