कुटीर रुग्णालयात कायमस्वरुपी डाँक्टरांचा अभाव, ट्रामाकेअर सेंटर धुळखात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

शहरातील नागरिकांचे आरोग्य बाबत सर्वच उपाययोजना राबविल्या जात आहे.कुटीर रुग्णालयात कायमस्वरुपी डाँक्टरांची नियुक्ती व रुग्णालयात गरजु उपकरणे व साधनांबाबत पाठपुरावा केला जाईल.
करण पाटील, नगराध्यक्ष,पारोळा

 

पारोळा : येथील रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला असतांना देखील कायमस्वरुपी डाँक्टरांचा अभावामुळे कंत्राटदार पदावर दोन तर प्रभारी वैद्यकिय अधिकारी म्हणुन एक अश्या तीन जणांवर संपुर्ण कुटीर रुग्णालय सुरु अाहे.जवळपास  50 खाटांचे ट्रामाकेअर सेंटर शासनाच्या उदासिनतेमुळे धुळखात पडुन आहे.
शहर हे राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने  वाहनांच्या किंवा  महामार्गावरिल समस्यांमुळे या ठिकाणी नेहमीच  अपघातांच्या मालिका सुरु राहतात.परंतु कायमस्वरुपी रुग्णालयात अस्थिरोग,बालरोग,स्रीरोग व भुलतज्न डाँक्टर नसल्यामुळे व 12 कर्मचारी व 3 डाँक्टर्स  यावर पुर्ण रुग्णालय सुरु असल्याने आपातकालिन परिस्थिति उध्दभवल्यास फक्त प्राथमिक उपचार करुनच रुग्णास जिल्हा रुग्णालयात उपचार घ्यावे लागत असल्याने लोक प्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देवुन आरोग्य सुविधेबाबत पाठपुरावा करणेची गरज आहे.एक्स रे मशिन,आँपरेशन थिएटर,विषप्राशन केलेल्या व्यक्तीसाठी सेक्शन,इसीजी व माँनिटर मशीन एवढ्याच तुटपुंज्या सुविधांवर डाँक्टरांना कसरत करुन रुग्णांची सेवा करावी लागत आहे.हायवेलगत असलेल्या व उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेल्या कुटीर रुग्णालयात स्रीरोग तज्न डाँक्टरांचा अभावामुळे गेल्या 15 ते 20 वर्षापासुन सोनोग्राफी मशीन नसल्यामुळे गरोदर माता व अनेक रुग्णांची तपासणी करणेसाठी नागरिकांना बाहेर तपासणी करुन पैसे मोजावे लागत आहे.

ट्रामाकेअर सेंटर धुळखात पडुन 
शहरात  रुग्णांना अद्यावत व सर्व सुविधा असाव्यात यासाठी ट्रामाकेअर सेंटरची बांधण्यात आले.वारंवार पाठपुरावा करुन देखील ट्रामाकेअर सुरु करणेसाठी अडचण येत अाहे. सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र व्यवहार केला असतांना देखील काम रेंगाळले कसे? असा प्रश्न रुग्णांना पडला आहे.
कोरोनाच्या पाश्वभुमीवर तालुक्यात वैद्यकिय अधिकारी सह डाँक्टर्स,नर्स,व कर्मचारी हे जीव धोक्यात घालुन लोकांना सेवा देत आहे.कोरोना बाबत आपतकालिन परिस्थितिसाठी कुटीर रुग्णालयात 10 बेडची तर ट्रामाकेअर येथे 20 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.आजवर पुणे,मुंबई,सुरत येथील 2500.रुग्णाची तपासणी करण्यात येवुन लक्षणे दिसणार्यांना होम कोरोनटाईनच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान भविष्यात आपतकालिन रोगराईची परिस्थिति उध्दभवल्यास फक्त प्राथमिक उपचार करुन रुग्णांस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले जाणार असेच चित्र सध्या तरी पाहावयास मिळत.यासाठी  लोकप्रतिनिधी व शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकात बोलले जात होते. आपातकालिन परिस्थितीत रुग्णांना  उपचारादाखल ये- जा करणेसाठी 108 व 102 रुग्णवाहीका कार्यरत आहे.

 

शहर हायवेलगत असल्याने अपघातांची मालिका व नियमित रुग्ण तपासणी करुन आहे त्या उपकरणांचा वापर करुन रुग्ण बरा कसा होईल याबाबत काऴजी घेत आहोत.
योगेश साळुंखे, प्रभारी वैद्यकिय अधिकारी कुटीर रुग्णालय,पारोळा

रुग्णालयात नियमित डाँक्टरांचा अभाव असला तरी उपलब्ध डाँक्टर व कर्मचारी यांच्यामुळे रुग्णसेवा चांगल्या प्रकारे हाताळली जात आहे.शासनाने पाठपुरावा करुन उपकरणांची संख्खा वाढवावी हीच अपेक्षा 
पुष्पा पाटील,  गृहीणी,पारोळा
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola hospital no residensial docter and tramacare center on use