मातीचे घर कोसळून सहा जण दबले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

जळगाव ः शेवगे बु. (ता.पारोळा) येथे काल झालेल्या जोरदार पावसाने गावातील मातीचे घर पडून एकाच कुटुंबातील सहा जण दाबले गेल्याची घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. यात सर्वजण गंभीर जखमी झाले असून रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

जळगाव ः शेवगे बु. (ता.पारोळा) येथे काल झालेल्या जोरदार पावसाने गावातील मातीचे घर पडून एकाच कुटुंबातील सहा जण दाबले गेल्याची घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. यात सर्वजण गंभीर जखमी झाले असून रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
पारोळा तालुका परिसरात शनिवारी (ता.20) सायंकाळी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला. या पावसामुळे शेवगे बुद्रुक येथील पाटील कुटुंबीय हे आज शेतात काम नसल्याने घरीच होते. घरातील सर्व सदस्य घरात बसलेले असताना सकाळी साडेअकराच्या सुमारास अचानक वाल्मिक पाटील यांच्या घराचे मागच्या बाजूचे चार चष्म्यांचे मातीचे घर कोसळले. यात गं.भा. कल्पनाबाई पाटील (वय 49), सागर पाटील (वय16), कविता पाटील (वय24), ललित पाटील (20), वाल्मीक पाटील (22), छबाबाई पाटील (70) असे सहाही जण दाबले गेले. घर कोसळण्याचा मोठा आवाज झाल्याने गावात पळापळ सुरू होऊन मिळेल; त्या साहित्याने गावातील तरुणांनी मातीचा ढिगारा उपसत जखमींना बाहेर काढले रुग्णवाहिकेत डॉ. सुनील पारोचे, प्रमोद सूर्यवंशी यांनी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. सदरची घटना रात्री घडली असती, तर मोठा अनर्थ झाला असता. मातीच्या ढीगाऱ्यात दबल्या गेलेल्या सहा जणांपैकी कल्पना पाटील, ललित पाटील, वाल्मीक पाटील हे गंभीर जखमी असून, त्यांना प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ धुळे येथे हलविण्यात आले आहे. तर अन्य जखमींवर डॉ. योगेश साळुंखे, परिचारिका सरला पवार, डॉ. अंजली पाटील, दीपक सोनार, राजू वानखेडे आदींनी उपचार केले. यावेळी तहसीलदार अनिल गवांदे, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, हवालदार काशिनाथ पाटील, अनिल वाघ, मंडलाधिकारी पी. ए. पाटील, प्रदीप गांगुर्डे, शहर तलाठी निशिकांत पाटील, भैय्या निकम, बी. टी. पाटील आदींनी भेटी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola house rain