आहो आश्‍चर्य ना...पळसाच्या झाडाला पाने तीन म्हणावे की पाच ! 

आहो आश्‍चर्य ना...पळसाच्या झाडाला पाने तीन म्हणावे की पाच ! 

पारोळा : सामाजिक जीवनात वावरतांना व्यवहारात आपण नेहमीच उपमा देतांना  " पळसाला पाने तीन " असे म्हणत असतो.मात्र नगांव ता,पारोळा शिवारातील प्रगतशील शेतकरी व माजी मंत्री डाँ सतीष पाटील यांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत ( बाळुनाना )गोविंदा पाटील यांच्या शेतात आज चक्क पळसाला पाने पाच असल्याचे  पाहावयास मिळाले.त्यामुळे आता पळसाला पाने तीन कि पाच असे म्हणण्याची वेळ ही दुर्मिळ योग मुळे आल्याचे बोलले जात आहे.

बाहुटे ता,पारोळा येथील रहीवाशी व प्रगतशील शेतकरी यशवंत ( बाळुनाना) पाटील यांचे शेत नगांव शिवारात आहे. सध्या पावसाळा जवळ आल्याने सर्वच जण शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. शेतकरी यशवंत पाटील हे देखील आपल्या शेतात भुईमुग काढणीत व्यस्त होते.काम आटोपल्या नंतर थोडा विसावा घ्यावा.म्हणुन ते बांधावर आले.बसल्या बसल्या त्यांची नजर पळसाच्या झाडावर गेली.आणि चक्क पळसाच्या झाडाला तीन पाने ऐवजी पाच पाने दिसता क्षणी त्यांनी हा दुर्मिळ पानांचे चित्र फेसबुक पेजवर पाठविले.अनेकांनी ह्या निसर्ग पणाच्या दुर्मिळ रहस्याबाबत आश्चर्य व्यक्त केले. 

गेल्या तीन वर्षापासुन बांधावर पळसाला पाने पाच 
नगांव शिवारात वडीलोपार्जित बागायती शेत असल्यामुळे शेतकरी यशवंत पाटील  हे शेतात पत्नी सुनिता पाटील,चिरंजीव गौरव पाटील यांच्या सहकार्याने  ज्वारी,बाजरी,गहु,हरभरा भुईमुग असे वेगवेगळे पीक घेत असतात.शेतात मशागतीच्या वेळी उन्हाळ्यात बांधावर गेल्या तीन वर्षापासुन पळसाला तीन पाना ऐवजी पाच पानांचा दुर्मिळ योग ते डोळ्यादेखत पाहत आहे.
दरम्यान पळसाचा उपयोग गरीब व गरजु नागरिकांसह काही शेतकरी झोपडी तयार करण्यासाठी वापरतात.बाजरीच्या चार्याबरोबर याचा उपयोग होत असल्यामुळे पावसाळ्यात झोपडीचे आच्छांदन म्हणुन हे पळसाची पाने महत्वाची मानली जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com