जब तक सुरज चॉंद रहेगा संजय ठाकरे नाम रहेगा... 

sanjay thakre
sanjay thakre

पारोळा : जम्मु- काश्‍मीरमधील सुई कॅंम्प येथे मंगळवारी कर्तव्यावर असतांना जखमी झालेल्या देवगाव येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे जवान संजय ठाकरे यांचा बुधवारी सकाळी मृत्यु झाला होता. त्यांच्या पार्थिवावर आज (ता.17) सकाळी शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जळगाव पोलिस मुख्यालयाच्यावतीने शोक सलामी पथकाने शस्रासह राऊंडची सलामी दिली. 
जम्मू- काश्‍मिरमधील सुई कॅम्प येथे जखमी झालेले संजय ठाकरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यापुर्वी संजय ठाकरे यांचे पार्थिवाची गावात मिरवणुक काढण्यात आली. देशभक्तीपर गीत वाजविण्यात आले. तसेच प्रत्येक घरासमोर रांगोळी टाकण्यात आली होती. जिल्ह्याभरातुन मोठ्या प्रमाणात लोक अंत्ययाञेसाठी दाखल झाले होते. गावातील सर्व महिला, विद्यार्थ्यी देखील अंतयात्रेत सहभागी झाले होते. शहीद जवान संजय ठाकरे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, जब तक सुरज चॉंद रहेगा संजय ठाकरे नाम रहेगा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. संजय ठाकरे यांचा मुलगा हिमांशु ठाकरे यांनी त्यांना अग्नीडाग दिला. यावेळी एरंडोल- पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या आर आर कॅंट इंदौर पथकाचे जगदीश शर्मा, सत्यजित सिंग, के. डी. प्रभाकर, एस. एस. चव्हाण व काकरापारा युनिट गुजरात पथकाचे संदिप पाटील, के. आर. पाटील, तहसिलदार ए. बी. गवांदे, पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे, नायब तहसीलदार पंकज पाटील, सहाय्यक निरीक्षक सुदर्शन दातीर, उपसरपंच समीर पाटील, नाभिक समाजाचे जिल्हाअध्यक्ष एकनाथ शिरसाठ, आधार पाटील, मनोराज पाटील, नंदकुमार पाटील, देवगाव पोलिस पाटील विश्वास शिंदे यांच्यासह जिल्हा व तालुक्‍यातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

देवगावला संजय ठाकरेंचे स्मारक ः आमदार चिमणराव पाटील 
शहीद जवान संजय राजाराम ठाकरे कर्तव्य बजावत असतांना मृत्यूमुखी पडल्याने त्यांचे देवगाव गावात स्मारक बांधण्यात येईल. याबाबत ग्रांमस्थांची चर्चा करुन योग्य नियोजन करुन निर्णय घेणार असल्याचे एरंडोल- पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com