परदेशातील खडतर वाटचाल टाळण्यासाठी हवे नियोजन

representational image
representational image

परदेशातील खडतर वाटचाल टाळण्यासाठी हवे स्वयंनियोजन 


    परदेशी शिक्षण हे अनेकांचे स्वप्न असते. ते सत्यात उतरवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून खूप कष्ट घेतली जातात. अनेकदा योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने तयारी चुकीच्या दिशेने जाते. परदेशात जाण्यासाठी पूर्वतयारी कशी करावी आणि तेथे पाऊल ठेवताच काय महत्त्वाचे आहे, हे जाणून घेऊन परदेशात शिक्षण घेतलेल्या रोहन पवारशी हा संवाद..! 

तुम्ही परदेशात कोणत्या प्रकारचे शिक्षण आणि ते कुठे घेतले? 
रोहन ः मी परदेशात एमएस केले आहे. फार्मास्युटिकल ऍनॅलिसिस या विषयात शेफिल्ड हॅलम या इंग्लंडच्या युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतले. मी त्या वर्षीचा टॉपर विद्यार्थी होतो. 

परदेशात जायचे कधी ठरवले? 
रोहन ः परदेशात जायचे हे मी जवळपास दोन वर्षे आधीपासूनच ठरवले होते. त्यामुळे तेथे जाण्यासाठीची सर्व माहिती मी गोळा करीत होतो. मी पंचवटीतील औषधनिर्माणशास्त्राचा (फार्मसी) विद्यार्थी होतो. फार्मसीतच पुढे परदेशात काय करता येऊ शकते, याविषयी शिक्षक किंवा मित्रमंडळी यांच्याकडून जाणून घेत होतो, तेव्हा मला समजले, की प्रत्येक देशासाठी वेगवेगळी पूर्व प्रवेशपरीक्षा असते आणि एकाच वेळी एकच देऊन काही उपयोग नसतो. त्यामुळे मी GRE, TOFFEL अशा परीक्षांची तयारी करू लागलो. 

या परीक्षांची तयारी कशी केली? 
रोहन ः या परीक्षांची तयारी करायची आणि संबंधित युनिटला कळवायचे ते आपली परीक्षेची तारीख ठरवतात. सगळ्यांची एकाच दिवशी सरसकट अशी ही परीक्षा नसते. त्यामुळे त्याचा अभ्यास करण्यासाठी समुपदेशक किंवा ती प्रक्रिया आधी अनुभवलेल्या व्यक्तींना भेटणे, पाच ते सहा तास अभ्यास करायचो आणि प्रामुख्याने रात्री अभ्यास करायचो. GRE, TOFFEL या दोन्ही परीक्षांचा "स्कोअर' लगेच दिला जातो. त्यानंतर येते विद्यापीठांची नियमावली, फीडबॅक, व्हीसा तयारी या सगळ्यांची चौकशी आधीच करून ठेवली होती. या सर्व प्रक्रियेला कागदपत्रांची खूप जमवाजमव करावी लागते. याची विद्यार्थ्यांनी तयारी ठेवावी. काही कागदपत्रे तत्काळ मिळत नाहीत, त्यासाठी आधीपासूनच कागदपत्रे जमवून ठेवावीत. 

विमान प्रवासातील काही आठवणी? 
रोहन ः मला कनेक्‍टिव्ह फ्लाइट मिळाली होती. त्यामुळे पहाटे तीनच्या दरम्यान माझे विमान स्वित्झर्लंडला थांबले होते. सहा तास मी त्या विमानतळावर बसून होतो. माझ्याकडे त्या वेळी चलन पाउंड होते आणि स्वित्झर्लंडचे चलन युरो नसल्याने कुठे फिरण्याचा प्रश्‍नच नव्हता. माझ्या आजोबांनी मी निघताना संबंधित देशाच्या चलनाचा बटवा मला भेट दिला होता. त्यात पाच डॉलरची नोट होती. ती नोट आठवल्याने दूरध्वनी करणे आदी गोष्टी मी करू शकलो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कनेक्‍टिव्ह फ्लाइट असेल आणि तेथे फिरण्याची इच्छा असेल तर तसा व्हीसा ऍप्लाय करावे आणि संबंधित चलनही सोबत ठेवावे. 

परदेशात पोचल्यावरची वाटचाल कशी होती? 
रोहन ः वॉव, माझ्या आयुष्यातील तो अविस्मरणीय क्षण होता. मी 26 डिसेंबरला तेथे पोचलो. 25 ते 30 डिसेंबर त्यांच्याकडे "बॉक्‍सिंग डे' साजरा केला जातो. या दिवसांत तेथे दुकाने बंद असतात आणि सगळे फिरायला निघून जातात. त्यामुळे तेथे एकदम शुकशुकाट होता. मला काहीच सुचत नव्हते. मी मॅंचेस्टरला होतो आणि मला शेफल्डला जायचे होते. त्या संबंधी चौकशी केली तर तसे काही साधन नव्हते. टॅक्‍सीशिवाय पर्याय नव्हता. मात्र, ते अर्धा तासाचे अंतर कापण्यासाठी माझ्याकडे जवळपास 144 डॉलर म्हणजे भारतीय चलनातील 12 हजार रुपये मागण्यात आले. पण सगळीकडे दीड इंचापेक्षाही जास्त बर्फ असल्याने ट्रेनसुद्धा नव्हती. तो टॅक्‍सीवाला तयार झाला हेच महत्त्वाचे होते. 

परदेशात पोहचल्यावर राहण्यासाठी काही विशेष तयारी करावी लागते का? 
रोहन ः हो, तेथे पोचल्यावर आपल्याला एक नॅशनल नंबर घ्यावा लागतो तो आधारकार्डासारखाच असतो, त्यातून आपली माहिती मिळते. काही लीगल फॉर्मेलिटी पूर्ण कराव्या लागतात. आपण ज्या शिक्षणासाठी जातो, त्याची माहिती आपल्याला विद्यापीठ देते. विद्यापीठातर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्यात यूकेचा भौगोलिक अभ्यास करून दिला जातो. शिक्षक- विद्यार्थी ओळख, वागण्या-बोलण्याची माहितीही देतात. 

घरापासून एवढ्या दूर राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मनाची तयारी कशी करावी? 
रोहन ः मी अकरावी- बारावीला पुण्याला होतो. माझ्या मते विद्यार्थ्यांनी एकदम परदेशात जाण्यापेक्षा आधी थोडे दिवस घरापासून दूर राहून पाहावे. जेणेकरून आपल्याला एकटे राहाताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास होतो. 

सध्या तुम्ही काय करता? 
रोहन ः मी शेफिल्ड हॅलम येथील टॉपर असल्याने मला तिकडे नोकरी लागली असती. मात्र मला भारतात काम करायचे होते. त्यामुळे मी नाशिकला सारडा सर्कल येथे "रॅप' ऍनॅलिटीकल रिसर्च ऍन्ड ट्रेनिंग सेंटर सुरू केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com