कॉंग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांच्या घरातून सोन्याचे बिस्किटे चोरीला 

residentional photo
residentional photo

नाशिक : कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्या व नाशिक महापालिकेच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्या घरातून सोन्याची पाच बिस्किटे व 10 हजार रुपयांची रोकड असा 15 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. सदरची चोरीही घरातील नोकराने केली असून त्यास मराठवाड्यातील सेलू (परभणी) येथून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मंगळवारी (ता.11) मध्यरात्री सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डॉ. हेमलता पाटील यांचे पती आर्किटेक्‍ट निनाद पाटील यांच्या फिर्यादीनुसार, पाटील दाम्पत्य यांचा टिळकवाडीमध्ये बंगला आहे. मंगळवारी (ता.12) रात्री उशिरा निनाद पाटील यांना त्यांच्या कपाटामध्ये सोन्याचे पाच बिस्किटे व 10 हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ सरकारवाडा पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. 

दरम्यान, या बंगल्यामध्ये बंडू म्हसे (मूळ रा. सेलू, परभणी) हा गेल्या काही वर्षांपासून नोकर आहे. तर गेल्या पाचेक महिन्यांपासून त्यांचा मुलगा आकाश बंडू म्हसे हाही नोकर म्हणून बंगल्यात कामाला येत होता. संशयित आकाश याने घरातील साफसफाई करीत असताना, श्री. पाटील यांच्या कपाटाची चावी चोरली आणि संधी साधून त्याने त्यांच्या कपाटातून सोन्याचे पाच बिस्किटे व 10 हजार रुपयांची रोकड अशी 15 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेली.

   गेल्या 13 जानेवारीपासून त्याने पोबारा केला होता. तो सेलू येथे त्याच्या मूळगावी गेला असल्याचे पोलिसांना तपासात समोर आले. त्यानुसार, सरकारवाडा पोलिसांनी परभणी पोलिसांकडे संशयित आकाशसंदर्भातील माहिती कळविली असता, त्यांनी दोन दिवसांपूर्वीच संशयित आकाश यास सोन्याचे बिस्किटे विक्री करताना अटक केली असल्याची माहिती मिळाली. त्यासंदर्भात सरकारवाडा पोलिसांनी सदरची बिस्किटे ही नाशिकमधून चोरी केल्याचे सांगत, गुन्हा दाखल झाल्याची माहिती परभणी पोलिसांना पुरविली आहे. संशयित आकाश याचा ताबा घेण्यासाठी सरकारवाड्याचे पोलीस पथक रवाना केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com