पाटील, शेलारांची उचलबांगडी,आंदोलन बेकायदेशीर,पोलिसांचा दावा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

नाशिक- धार्मिक स्थळे निष्काषित करण्याची कारवाई थांबवावी, सिडकोतील घरांच्या विकासाला प्रचलित नियमावलीप्रमाणे परवानगी द्यावी, महापालिकेच्या मिळकती नाममात्र दरात द्यावा तसेच महिला बचत गटांमार्फतचं पोषण आहाराचा ठेका द्यावा या प्रमुख मागण्यासांठी गेल्या चार दिवसांपासून महापालिकेच्या सभागृहातचं ठिय्या आंदोलन करणारे माजी सभागृह नेते दिनकर पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, मनसेचे सलिम शेख व नगरसेवक रविंद्र धिवरे यांचे आंदोलन पोलिसांनी चिरडून टाकले.

नाशिक- धार्मिक स्थळे निष्काषित करण्याची कारवाई थांबवावी, सिडकोतील घरांच्या विकासाला प्रचलित नियमावलीप्रमाणे परवानगी द्यावी, महापालिकेच्या मिळकती नाममात्र दरात द्यावा तसेच महिला बचत गटांमार्फतचं पोषण आहाराचा ठेका द्यावा या प्रमुख मागण्यासांठी गेल्या चार दिवसांपासून महापालिकेच्या सभागृहातचं ठिय्या आंदोलन करणारे माजी सभागृह नेते दिनकर पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, मनसेचे सलिम शेख व नगरसेवक रविंद्र धिवरे यांचे आंदोलन पोलिसांनी चिरडून टाकले.

नगरसचिव विभागाने आंदोलन बेकायदेशीर असल्याचे पत्र पोलिसांना दिल्याने त्यानुसार कारवाई केल्याचा दावा पोलिसांनी केला तर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडल्याचा आरोप पाटील यांनी केला. 
मंगळवारी झालेल्या महासभेत पाटील यांनी वरिल प्रश्‍न उपस्थित करताना जोपर्यंत ठोस उत्तर मिळतं नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.

मंगळवारी रात्री नऊ वाजता पिठासनावर पाटील यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यांना राष्ट्रवादीचे शेलार, मनसेचे शेख व नगरसेवक धिवरे यांनी पाठींबा दिला. महापौरांनी विनंती करूनही आंदोलन सुरुचं ठेवले. रात्र-दिवस असे चार दिवस आंदोलन सुरु होते. आंदोलनाला हिंदुत्ववादी संघटनांसह सिडको, सातपूर विभागातील जेष्ठ नागरिक संघ, नागरिकांनी पाठींबा दिला. भाजप वगळता सर्वचं नगरसेवकांनी पाटील यांच्या आंदोलनाचे समर्थन केले परंतू कारवाईच्या भितीने कागदोपत्री पाठींबा कोणी दिला नाही. महापौरांसह भाजप पदाधिकारी, आमदारांनी आंदोलनाची दखलचं घेतली नाही तर उलटं पाटील यांचा काटा काढण्याची आयती संधी चालून आल्याचे निमित्त करतं आमदारांनी पालकमंत्री व थेट मुख्यंत्र्यांकडे तक्रारी केल्या. पाटील यांच्या आंदोलनामुळे पक्षाची बदनामी होत असल्याच्या तक्रारी पोहोचविण्यात आल्या. मिडीयावर देखील सातत्याने आंदोलन झळकतं असल्याने अधिवेशनातून वेळ काढतं पालकमंत्री गिरीष महाजन यांनी सुत्रे हलवतं सभागृह नेते पदावरून पाटील यांची उचलबांगडी केली.

 दुसऱ्या दिवशी पोलिसांचा ताफा पाटील यांना उचलण्यासाठी सभागृहात दाखल झाला. पाटील यांना नगरसचिव विभागाने पोलिसांना दिलेले पत्र वाचून दाखविले. त्यात बेकायदेशीर आंदोलन असल्याची तक्रार करण्यात आला. परंतू पाटील यांनी घटनेने दिलेल्या अधिकारानुसारचं आंदोलन होत असल्याचा दावा केला. पाटील आंदोलन सोडण्यास तयार नव्हते परंतू पोलिसांनी कडे करण्याची तयारी करताचं पाटील यांनी अटक करून घेण्याची तयारी दर्शविली. पालिका मुख्यालयातून प्रवेशद्वारापर्यंत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाटील यांना पोलिस व्हॅन मध्ये बसवतं असताना विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना किरकोळ विरोध केला. परंतू पोलिसांनी जुमानले नाही. 

सनदशीर मार्गाने माझे आंदोलन सुरु होते. मी केलेले आंदोलन स्वतासाठी नव्हे तर नाशिककरांसाठी केले. परंतू पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडले. वास्तविक पिठासन अधिकारी म्हणून महापौरांची परवानगी पोलिसांना आवशक्‍य होती ती घेतली नाही.

- दिनकर पाटील, आंदोलक 

आंदोलनात घेतलेले मुद्दे लोकांशी संबंधित होते परंतू त्याचे उत्तर महापौरांनी दिले नाही. उलट पोलिसांना पाठवून सनदशिर मार्गाने सुरु असलेले आंदोलन चिरडले. आता लोकांमध्ये जावून आंदोलन करू.- गजानन शेलार, आंदोलक. 

पाटील यांच्या सनदशीर आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मी सुध्दा सहभागी झालो होतो परंतू पोलिसांनी आम्ही मोठे गुन्हेगार असल्याचा दिखावा निर्माण करतं मोठ्या फौज फाट्यासह आंदोलन उधळून लावले.- सलीम शेख, आंदोलक
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news patil,shelar agatation