ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या दौऱ्यानंतर सरकारला जाग,उद्या केंद्रीय मंत्री,पालकमंत्री दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

नाशिकः जिल्ह्यात 7 लाख 40 हजार हेक्‍टरपैकी 3 लाख 40 हजार हेक्‍टरचे नुकसान झाले आहे. जिल्ह्याला बसलेल्या या अभूर्तपूर्व दणक्‍याची तीव्रता लक्षात आलेल्या ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर आता शासनाला जाग आली आहे. श्री पवार यांच्या पाठोपाठ उद्या रविवारी (ता.3) पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले उद्या दिवसभर जिल्ह्यातील पीक स्थितीची पाहणी करणार आहे. 

   पालकमंत्री गिरीश महाजन उद्या रविवारी विमानाने नाशिकला येणार असून निफाड, चांदवड, दिंडोरी आणि नाशिक तालुक्‍यात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासोबत दौरा करणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेही इगतपुरी तालुक्‍याचा दौरा करणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news PAWER TOUR