ऑनलाईन पेमेंटमुळे एटीएमवरचा भार हलका 

residentional photo
residentional photo

नाशिक : दोन-चार दिवसांच्या शासकीय सुट्टीमुळे बॅंकेचे व्यवहार ठप्प होऊन ग्राहकांची कोंडी व्हायची. त्यावर एटीएमचा पर्याय आला. मात्र त्यातही जास्त दिवसांची सुट्टी असल्यास चलनाअभावी खडखडाट होऊन ग्राहक निराश होत. गेल्या आठवडाभरात तीन दिवस बॅंका बंद असतांनाही एटीएम बाहेर रांगा नाहीत की, एटीएमचा खडखडाटही दिसून आलेला नाही. ऑनलाईन पेमेंटचे एकापेक्षाही अधिक पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकांना मोठा दिलासाच मिळाला आहे. तसाच एटीएमवर खूप मोठा भारही हलका झाला आहे. 
गेल्या शुक्रवारपासून रविवारपर्यंत राष्ट्रीयकृत बॅंकांसह खासगी बॅंका बंद होत्या. सोमवारी नियमित बॅंका सुरू झाल्या आणि पुन्हा आजपासून (ता.25) दोन दिवस बॅंका बंद आहेत. त्यामुळे आठवडाभरामध्ये 5 दिवस बॅंका बंद राहणार असल्या तरी त्याचा विपरित परिणाम ग्राहकांवर दिसून आलेला नाही. तीन दिवसांच्या कालावधीमध्ये कुठेही एटीएममधील पैसे संपल्याने ग्राहकांना रांगा लावाव्या लागल्याचे चित्र दिसले नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com