"पेलिकन पार्क'च्या जागेवर मध्यवर्ती उद्यान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

नाशिकः गेल्या दहा वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या सिडकोतील पेलिकन पार्कच्या नुतनीकरणाचा मुद्दा निकाली निघाला असून शासनाने मंजुर केलेल्या निधीतून मध्यवर्ती उद्यानाची निर्मिती केली जाणार आहे. स्थायी समितीने साडे नऊ कोटी रुपयांच्या खर्चाला आज मान्यता दिली. नव्याने पार्क विकसित करण्यासाठी सुमारे साडे सतरा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. उर्वरित रक्कम महापालिका स्वनिधीतून अदा करेल. उद्यान विकसित झाल्यानंतर पेलिकन ऐवजी नमो उद्यान नामकरण करण्याची तयारी भाजप नेत्यांनी केली आहे. दादासाहेब फाळके स्मारका पाठोपाठ शहरातील सर्वात मोठे उद्यान नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. 
   
मोरवाडी गावासमोरील महापालिकेने सतरा एकर भुखंडावर पेलिकन पार्क साकारले होते. पार्क चालविण्यात महापालिका असमर्थ ठरल्यानंतर पुणा ऍम्युझमेंट पार्क या कंपनीकडे सोपविले. कंपनीला बॅंक गॅरंटी दिल्याने वाद निर्माण झाला. महापालिका व ठेकेदार कंपनीमध्ये वाद निर्माण होऊन तो न्यायालयात गेला. न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर तेथून पेलिकन पार्कचा वनवास संपला. पेलिकन पार्कच्या जागेवर मध्यवर्ती उद्यान साकारण्यासाठी आमदार सिमा हिरे यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर शासनाने उद्यानासाठी साडे नऊ कोटी रुपये मंजुर केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pelican park new work sanction