पाण्याअभावी जळाली पाच एकर पेरुबाग 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

बाणगाव : दुष्काळी गाव अशी ओळख असलेल्या नांदगाव तालुक्‍यातील बाणगाव येथे दुष्काळाच्या दाहकता जाणवू लागली आहे. बाणगाव येथील जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांची 5 एकर पेरूची बाग भीषण पाणी टंचाई च्या मुळे जळाली आहे. पेरूबागा पाण्याअभावी जळाल्याने पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. 

बाणगाव येथील काही शेतकऱ्यांनी शेतीसाठी माणिकपुंज धरणांतून पाईपलाईन द्वारे पाणी आणले आहे .पण यंदा भीषण दुष्काळ पडल्याने माणिकपुंज धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी आरक्षित करण्यात आल्याने शेतीसाठी पाणी पुरवठा खंडित झाल्यामुळे पाण्याअभावी या बागा जळून गेल्या आहेत. बागा जगविण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसून, टॅंकरचा खर्च परवडणारा नाही. त्यामूळे जळालेल्या बागांचे करायचे काय अशा द्विधा मनस्थितीत येथील शेतकरी सापडला आहे

Web Title: marathi news peru