धरणे तुडुंब; तरी जळगावकरांवर जलसंकट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

जळगाव ः शहराला वाघूर धरणावरून पाणीपुरवठा केला जात असून उन्हाळ्यात धरणाची पाणीपातळी खालावल्याने पाणीपुरवठा दोन दिवसावरून तीन दिवसावर केला होता. परंतु पावसाळ्यात जोरदार पावसाने वाघूर धरण शंभर टक्के भरले असताना दोन दिवसावर पाणीपुरवठा करताच जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाले आहे. धरण फूल भरलेले असताना जळगावकरांवर जलसंकट ओढवले आहे. 

वाघूर धरण शंभर टक्‍के भरले असल्याने शहरात पाणीपुरवठा तीन दिवसांवरून दोन दिवसांवर करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला परंतु दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करताच तिसऱ्या दिवशी काव्यरत्नावली चौकात जलवाहिनी फुटल्याने शहराचा अनेक भागातील पाणी पुरवठा वेळापत्रक विस्कळित झाली. तर काही भागात पाणी पुरवठा न झाल्याने धरणात पाणी असताना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. 

काव्यरत्नावाली चौकात दुरुस्ती 
काव्यरत्नावली चौकात जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसापूर्वी विस्कळित झाला होता. दोन दिवसात जलवाहिनी दुरुस्ती न झाल्याने बुधवारी देखील जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे तीन दिवसापासून काव्यरत्नावली चौकात भर रस्त्यात मोठा खड्डा खोदल्याने चौकातील वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. 

नागरिकांची पाण्यासाठी भटकंती 
पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने शहरातील अनेक भागात ऐन दसऱ्याच्या दिवशी नळांना पाणी आले नाही. त्यामुळे नागरिकांना ऐन सणासुद्दीला पैसे देवून पाणी आणण्याची वेळ आली. तर काहींनी पैसे देवून पाण्याचे टॅंकर आणून पाणी भरावे लागले. 

जलवाहिनी फुटण्याची पिडा जाणार कधी ? 
शहराला वाघूर धरणावरून जलवाहिनी पुरवठा केल्या जाणाऱ्या जलवाहिनी वारंवार फुटून पाणीपुरवठा विस्कळित होण्याची पिडा दर महिन्याला जळगावकरांना भोगावा लागतो. त्यामुळे नागरिकांची ही पिडा कधी जाईल. अमृत जलवाहिनीचे काम कधी पूर्ण होऊन या पिडेतून मुक्त होऊ असे नागरिकांना वाटू लागले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pipe line damage jalgaon ond day late water