अमळनेरला आढळली प्लॅस्टिकची अंडी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

अमळनेर : गेल्या अनेक दिवसांपासून चीनी बनावटीच्या अनेक खाद्य वस्तू व भाजीपाला भारतात येत असल्याचे उघडीस आले आहे. त्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर तक्रारही होत असतानाच चीनने प्लास्टिकच्या अंड्यांची निर्मिती करत भारतीय बाजार पेठेत आणली, असे सर्वांनीच काही दिवसांपूर्वीच ऐकले होते. हे सर्व प्रकार आता समोर येऊ लागले असून आज आमदार शिरीष चौधरी यांनीच प्लास्टिकच्या अंड्यांची अमळनेरात झालेले पदार्पण उघडकीस आणले आहे.

त्याच्या कार्यालयीन कर्मचारी संग्राम पाटील (रा. केशवनगर) यांनी काही दिवसांपूर्वीच या भागातील किराणा दुकानावरून अंडी विकत घेतली होती. त्यापैकी अंडी त्यांनी खाल्ली. मात्र, काही अंडी त्यांनी उकळून घेतली असता, ही अंडी प्लास्टीकचे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

अंड्याचे आवरण अचानक कडक लागू लागल्याने त्यांनी त्याची तपासणी केली असता ते ती अंडी जळू लागले. आतील गर हा प्लास्टिकचा पिवळा थर बनू लागला. याबाबत त्यांनी जळगावचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी दूरध्वनी उचललाच नाही.

या सर्व घटनेची तक्रार तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पालिकेचे मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही व्हावी, असे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले.

कृत्रिम अंडी चीनमधून पाठवली जातात, असे बऱ्याचदा चर्चेत व सोशल मीडियावर येत असते. तेथे अंड्यामधले पिवळे बलक आणि त्याच्या बाहेरचा सफेद भाग सोडियम एग्लिनाईट, एल्युमिनियम, जिलेटिन आणि खाद्य तेलापासून तयार केले जातात. तसेच यात पाणी आणि रंग मिक्‍स करून त्याला तंतोतंत खऱ्या अंड्याचे रूप दिले जाते. हे अंडी जर आहारात आली तर नागरिकांचे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतील. 

Web Title: marathi news Plastic Eggs North Maharashtra Amalner news