शहरात गावठी कट्ट्यांचा बाजार,दहा दिवसात 10 कट्टे जप्त  ... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

नाशिक : नाशिक शहरामध्ये गेल्या दहा दिवसांमध्ये 10 गावठी कट्टे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तर गत चार महिन्यांमध्ये नाशिकमध्ये विक्री करण्यासाठी आलेले 19 गावठी कट्ट्यांसह संशयितांना पोलिसांनी गजाआड केले आहेत. यामुळे परराज्यातून नाशिकमध्ये येणाऱ्या गावठी कट्ट्यांचा चोरी-छुपा गावठी कट्ट्याचा बाजार थाटला तर नाही ना, असा संशय व्यक्त होऊ लागला आहे.

शहरातील गुन्हेगारी आटोक्‍यात आणण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळल्या असताना, गावठी कटटयाच्या चोरी-छुप्या बाजारातून नवीन टोळी उभी राहत असल्याने ही टोळी उदध्वस्त करण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर उभे राहू पाहते आहे. 

   नाशिक शहरात गेल्या 30 दिवसांमध्ये 12 गावठी कट्टयांसह संशयितांना अटक करण्यात आली आहे. यापैकी 11 गावठी कट्टे हे गेल्या दहा दिवसांमध्ये पोलिसांच्या हाती लागले आहेत. महाराष्ट्र-मध्यप्रदेशातील सीमावर्ती भागातून नंदूरबार-धुळेमार्गे नाशिकमध्ये हे गावठी कट्टे विक्रीसाठी दाखल होत असतात,

 हे आत्तापर्यंतच्या पोलीस तपासातून समोर आले आहे. परंतु गावठी कट्‌यांच्या तस्करीला आळा घालण्यात पोलिसांना अपयश आले आहे. गेल्या जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत नाशिक शहरात 7 गावठी कट्टे जप्त केले तर चालू एप्रिल महिन्यात तब्बल 12 गावठी कट्टे सापडले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये गावठी कट्टांचा चोरी-छुपा खरेदी-विक्रीचा बाजार भरतो की काय, असा सवाल उपस्थित होतो आहे. 

सीमावर्ती पोलीस यंत्रणा ठरतेय कुचकामी 
गावठी कट्ट्यांसह परजिल्ह्यातील गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी नाशिक परिक्षेत्रासह जिल्ह्यांच्या सीमावर्ती जिल्हा पोलीस अधीक्षकांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्या पुढाकारातून नाशिक पोलीस आयुक्तालय, नाशिक ग्रामीण, अहमदनगर, धुळे, औरंगाबाद शहर-ग्रामीण, जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यांच्या पोलीस प्रमुखांची बैठका झाल्या. यात प्रामुख्याने शस्त्रांस्त्रांची होणारी तस्करी आणि एका शहरात गुन्हा करून दुसऱ्या शहरात आश्रय घेणाऱ्या गुन्हेगारांची माहितीची देवाण-घेवाण करण्याचे ठरले.

  गेल्या 2017 यावर्षी चांगला परिणाम दिसून येत वर्षभरात केवळ 8 गावठी कट्टे शहरात सापडले होते. परंतु पुन्हा गावठी कट्ट्यांची तस्करी वाढल्याने नेमलेली यंत्रणा कुचकामी ठरल्याचे स्पष्ट होते आहे. 
 
चार महिन्यात सापडलेले कट्टे 
जानेवारी - 3 
फेब्रुवारी - 2 
मार्च - 2 
एप्रिल - 12 

Web Title: marathi news police procure in nasik

टॅग्स