आयुक्तालयांतर्गत आठवडाभरात बदल्या, आयुक्तांचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

नाशिक : शासनाच्या गृहविभागाकडून होणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या असताना, नाशिक पोलीस आयुक्तालयाअंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांची बदल्या आठवडाभरात करण्याचे संकेत पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. पोलीस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांनी बदल्यांसाठी प्रशासन विभागाकडे अर्ज केले आहेत. विशेषत: यावेळी विनंती बदल्यांचेच अर्ज अधिक असल्याचे प्रशासनासमोर मोठा पेच आहे

 एरवी एप्रिल महिन्यामध्ये आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या आणि बदल्या होत असतात. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपासून निरीक्षकांपर्यंतच्या बदल्यांचा सोपस्कार पार पाडले जातात. यंदा मात्र मे महिना अर्ध्यावर आला तरी गृहविभागात बदल्यांसंदर्भात कोणतीही हालचाल नाही. त्यामुळे बढतीवर असलेले पोलीस अधिकाऱ्यांसह बदल्यांसाठी "फिल्डिंग' लावून असलेले पोलीस अधिकारी अस्वस्थ आहेत. चालू महिन्यात या बदल्या न झाल्यास त्या नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत लांबण्याची शक्‍यता आहे. 

  पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी येत्या आठवडाभरात बदल्यांचे संकेत दिले आहेत. पोलीस ठाण्यांमध्ये फारसे खांदेपालट होणार नसले तरी पंचवटी व अंबड पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा कार्यकाळ संपला असल्याने त्यांच्या अन्यत्र बदली होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तर, मुंबई नाका, म्हसरुळ, आडगाव पोलीस ठाण्याच्या कामकाजाविषयी नाराजी असल्याचीही चर्चा आहे. अन्य पोलीस ठाण्यात फारसे बदल होण्याची शक्‍यता नाही. 

  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई या पदावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतील. या बदल्यांसाठी अनेकांनी दोन-तीन महिन्यांपूर्वीच प्रशासनाकडे अर्जफाटे केले आहेत. काहींनी आजारपणाचे तर काहींनी या ना त्या कारणाने विनंती बदली अर्ज केले आहेत. काहींनी शिफारशीही अर्जांसोबत जोडल्या आहेत.

 काहींनी आयुक्तांची भेट घेत बदलीची कारणे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रशासनासमोर या बदल्यांचा पेच आहे तर कर्मचारी मात्र बदलीसाठी देव पाण्यात घालून बसलेत. मात्र आयुक्‍तांनी गेल्यावेळी दिलेला झटका कर्मचारी विसरलेले नाहीत. तरीही आयुक्तांच्या बदल्यांबाबतच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. 

Web Title: marathi news police transfers