महापालिकेत भाजपला रोखण्यासाठी हालचाली गतिमान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

नाशिक- महापालिकेत भाजपचे बहुमत असले तरी पुढील आठवड्यात होणाया महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. शुक्रवारी रात्रीपासून आज दिवसभर शिवसेना, कॉंग्रेस, मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये समन्वय साधण्यात आला एकाही पक्षाने दुजोरा दिला नसला तरी भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी एकत्र येण्यावर मात्र एकमत असल्याने यातचं महाशिवआघाडीची सत्ता समिकरणे उदयाला आली आहे. त्यासाठी शिवसेनेने सत्तेसाठी पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे. 

गणित जुळविण्याची कसरत

महापालिकेत भाजपचे 65, शिवसेनेचे 35, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे प्रत्येकी सहा, मनसेचे पाच तर अपक्ष तीन व रिपाईचा एक नगरसेवक आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप व शिवसेनेच्या एका नगरसेवकाने राजीनामा दिल्याने सध्या 120 संख्याबळ आहे. महासभेत सत्ता स्थापन करण्यासाठी 61 नगरसेवकांची गरज आहे. भाजपचे बहुमत कागदावर दिसतं असले तरी माजी आमदार बाळासाहेब सानप समर्थक तेरा नगरसेवक त्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. शुक्रवारी पाच नगरसेवकांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. किमान दहा सदस्यांनी भाजप विरोधात भुमिका घेतल्यास शिवसेनेसह विरोधकांची ताकदं 60 पेक्षा अधिक नगरसेवकांची होत असल्याची आकडेमोड दिसू लागल्याने शिवसेनेने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आता खुले आम भुमिका घेतली आहे. त्यादृष्टीने शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे व अपक्षांशी बोलणी सुरु झाली आहे. सर्वचं विरोधी पक्षांची संयुक्त बैठक झाली नसली तरी भाजपला सत्तेपासून रोखण्यावर आज एकमत झाल्याने भाजपला विरोधकांकडून आव्हान निर्माण झाले आहे त्यात भाजपचे दहा पेक्षा अधिक नगरसेवक संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने भाजपची धडधड वाढली. 
बोरस्ते महापौर पदाचे उमेदवार 
माजी आमदार बाळासाहेब सानप शिवसेनेत दाखल झाल्याने त्यांना भाजप मधील समर्थक नगरसेवकांची देखील साथ असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे दहा नगरसेवक सोबत असल्याने त्या आधारे शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यात राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेची महाआघाडी स्थापन झाल्याने महापालिकेत देखील महाशिवआघाडीचा पॅटर्न राबविण्याचा भाग म्हणून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ मिळाल्याने शिवसेनेने सत्ता काबिज करण्यासाठी आघाडी घेतली आहे. त्यात विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांचे नाव महापौर पदासाठी पुढे आले आहे. बोरस्ते यांचे भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले संबंध, महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव तसेच बोरस्ते उमेदवारी करणार असतील तर शिवसेनेसह सर्वचं विरोधी पक्षांचा पाठींबा राहणार असल्याने त्यामुळे बोरस्ते यांचे नाव महापौर पदासाठी समोर आले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news political development