राजकीय भुकंपाचा "नाशिक पॅटर्न' तर नव्हे? 

live
live


नाशिक- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही आमदारांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा भुकंप झाला खरा परंतू त्या भुकंपाचा धक्का नाशिककरांना कमी बसला त्याला कारण म्हणजे राज्यात जे घडले त्याच्या एक दिवस आधी महापालिकेची सत्ता काबिज करताना नाशिक मध्येही तेचं घडले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात वापरण्यात आलेला पॅटर्न नाशिक पॅटर्न तर नव्हे ना? असा सवाल नाशिककरांमधून उपस्थित केला गेला. 

महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी नाशिक मध्ये मोठा राजकीय क्‍लायमेक्‍स घडला. पालिकेत भाजपकडे बहुमत असतानाही भाजपच्या बारा नगरसेवकांनी शिवसेनेला साथ दिल्याने शिवसेनेच्या सत्ता स्थापनेचे हौसले बुलंद झाले. महापालिकेत भाजपची सत्ता उलथतं असतानाचं शेवटच्या दिवशी आकड्यांचे गणित जुळतं नसल्याने नगरसेवकांनी पुन्हा भाजप मध्ये प्रवेश केल्याने भाजपची सत्ता जाता-जाता वाचली.

सत्ता स्थापनेची अशीही खेळी

गेल्या आठ दिवसांपासून नाशिककर सत्तेचा हा खेळ पाहतं होते. शुक्रवारी राजकीय क्‍लायमेक्‍स संपल्यानंतर शनिवारी राज्याच्या राजकारणा जे काही नाट्य घडले गेले ते नाशिक मधील राजकारणाची साम्य असलेले ठरले. नाशिक मध्ये भाजपचे आमदार फुटल्याने शिवसेनेने सत्ता स्थापनेची खेळी खेळली. तर राज्यात भाजपला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी पाठींबा दिल्याने भाजपला बहुमत सिध्द करण्याचे निमंत्रण राज्यपालांनी दिले.

घडामोडींना वेग

नाशिक महापालिकेत कॉंग्रेसने उपमहापौर पदाची मागणी केली तर जे नगरसेवक फुटून गेले त्यांना देखील उपमहापौर पद हवे होते. शेवटच्या क्षणी कॉंग्रेसने उपमहापौर पदाच्या माध्यमातून सत्तेचा दावा कायम ठेवल्याने फुटलेल्या नगरसेवकांनी हाती काहीचं लागतं नसल्याने पुन्हा भाजप मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. राज्यातील घडामोडींमध्ये अजित पवार यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांनी आम्हाला काय चाललयं हे माहीतचं नाही असा दावा करतं पुन्हा राष्ट्रवादीचा रस्ता पकडल्याने नाशिक मध्ये एक दिवसापुर्वी जे घडले तेचं राज्यात घडताना दिसतं असल्याची भावना नाशिककरांमध्ये निर्माण झाली. 

सत्तेसाठी काही पण 


नाशिक मध्ये भाजपकडे बहुमत असतानाही नगरसेवक फुटले तर राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्‍यता असताना देखील अजीत पवार यांच्यासह काही आमदारांनी भाजपला साथ दिली. भाजप व कॉंग्रेस मध्ये वैचारीक मतभेद असताना देखील नाशिक मध्ये भाजपला अप्रत्यक्ष मदत केली तर राज्यात भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये वैचारीक दुरावा असतानाही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यात आली. त्यामुळे सत्तेसाठी काहीही होवू शकते यावर नाशिककरांचे एकमतं होताना दिसतं आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com